वैभववाडी | प्रतिनिधी :नापणे रेल्वे स्टेशन ते कोकाटेवाडी कुसूर रस्ता कामाचा शुभारंभ वैभववाडी भाजपा अध्यक्ष नासीर काझी यांच्या हस्ते करण्यात आला. आमदार नितेश राणे यांच्या माध्यमातून या रस्ता कामासाठी तब्बल 25 लाख रुपये चा निधी मंजूर झाला आहे. पहिल्यांदाच इतक्या मोठ्या प्रमाणात निधी मिळाल्यामुळे सदर रस्ता निर्धोक होणार आहे. या रस्त्याचा चांगला फायदा उंबर्डे, भुईबावडा परिसरातील प्रवाशांना रेल्वे स्टेशन कडे ये जा करण्यासाठी होणार आहे. रस्ता काम शुभारंभ प्रसंगी माजी जि. प. सदस्य सुधीर नकाशे, बंड्या मांजरेकर, सरपंच प्रदीप जैतापकर, उपसरपंच प्रकाश यादव, ग्रामपंचात सदस्य सुरेश जैतापकर, उदय जैतापकर, मनोहर पाटील, विजय खाडे, राजाराम लाड, रमाकांत जैतापकर, जयवंत जैतापकर, चंद्रकांत बोडेकर व मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.
यावेळी काझी म्हणाले, नापणे गावाला विकास कामासाठी मोठ्या प्रमाणात निधी देण्यात आला आहे. आमदार नितेश राणे यांच्या माध्यमातून प्रलंबित विकास कामे ही भविष्यात पूर्ण होतील. गावात पक्ष संघटना वाढीसाठी ही कार्यकर्त्यांनी मेहनत घेतली पाहिजे. असे सांगितले.












