रत्नागिरी येथे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश सोहळा
मालवण | प्रतिनिधी : मालवण चौके येथील प्रसिद्ध चिरेखाण व्यावसायीक तथा उद्योजक प्रितम विलास गावडे यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत मनसे पक्षात प्रवेश केला आहे. रत्नागिरी येथील जाहीर सभेत हा पक्षप्रवेश करण्यात आला. सोबत मालवण मधील अनेक युवकांनी मनसे मध्ये जाहीर प्रवेश केला.
मालवणातील चौके येथील प्रसिद्ध चिरेखाण व्यावसायीक व उद्योजक कै. विलास गावडे यांचे सुपुत्र असलेले युवा उद्योजक प्रितम गावडे हे कै. विलास गावडे कंस्ट्रक्शन व रुबाब मेन्स विअर चे मालक आहेत.
रत्नागिरी येथील जाहीर सभेत सहकाऱ्यांसोबत राज ठाकरेंच्या हस्ते महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत त्यांनी प्रवेश केला. सोबत मालवण मधील अन्य पक्षाच्या काही कार्यकर्त्यांनी देखील मनसे मध्ये जाहीर प्रवेश केला.
यावेळी प्रितम विलास गावडे यांच्या सोबत, गणेश सातार्डेकर, राहुल मोंडकर, लौकिक मेथर, तथागत मालवणकर, चिन्मय कुणकवळेकर, प्रमोद डिचवलकर, रोहन तावडे, हर्ष जोशी हे उपस्थित होते. याप्रवेशादरम्यान महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते शिरीष सावंत, मनसे सरचिटणीस परशुराम (जीजी) उपरकर यांच्या मार्गदर्शनाखाली मनविसे माजी जिल्हाध्यक्ष कुणाल किनळेकर, मनविसे कार्यकारणी सदस्य महाराष्ट्र राज्य व रत्नागिरी सिंधुदुर्ग चे संपर्क अध्यक्ष अमोल साळुंखे, मनविसे उपजिल्हाध्यक्ष प्रतिक कुबल, मनविसे तालुका अध्यक्ष संदीप लाड यांनी
विशेष प्रयत्न केले. प्रितम विलास गावडे व त्यांच्या सहकाऱ्यांच्या प्रवेशाने मालवण मनसे ला नवसंजीवनी मिळेल असेल मनसे कडून सांगण्यात येत आहे. मालवण तालुक्यात लवकरच आणखी काही पक्षाप्रवेश मनसे पक्षात होतील. अशी माहिती अमित इब्रामपूरकर यांनी दिली.