लांजा (प्रतिनिधी) सध्याच्या सोशल मीडियाच्या युगात पन्हळे आनंदगाव येथील शाहीर दत्ताराम मसणे हे गेली 25 वर्षाहून अधिक काळ कोकणातील प्रसिद्ध अशी जाकडी ही लोककला जोपासत आहेत.
सध्याच्या युगात अनेक लोककला लोप पावत चालल्या असताना तालुक्यातील पन्हळे आनंदगाव येथील शाहीर दत्ताराम मसने हे घाडथळबाबा नाच मंडळ मसणेवाडी या मंडळाच्या माध्यमातून कोकणातील जाकडी लोककला जोपासण्याचे काम करत आहेत.
लहानपणापासूनच जाकडी नृत्याचे आकर्षण राहिलेल्या शाहीर दत्ताराम मसणे हे आपले गुरु विठ्ठल मसणे आणि तुकाराम मसणे यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या 25 वर्षाहून अधिक काळ घाडथळ बाबा नाच मंडळ मसणेवाडीच्या माध्यमातून जाकडी ही नृत्यकला जोपासत आहेत. जाकडी नृत्यकलेच्या माध्यमातून समाज प्रबोधनाचे काम देखील करत आहेत. आपल्या जाकडी नृत्यकलेच्या माध्यमातून ते विविध अनिष्ट प्रथा, परंपरा त्याचप्रमाणे घडणाऱ्या वाईट गोष्टी त्यांच्यावर प्रकाश टाकण्याचे आणि लोकांमध्ये जनजागृती, प्रबोधन करण्याचे काम ते आपल्या कलेच्या माध्यमातून करत आहेत.
सध्याच्या सोशल मीडियाच्या युगात जाखडी नृत्यकला काहीशी मागे पडत चालली आहे. मात्र तरी देखील ही लोककला जिवंत ठेवतानाच या कलेच्या माध्यमातून जनमानसात आणि समाजप्रबोधन करण्याचे काम शाहीर नसणे हे करत आहेत.लांजा राजापूरसह संपूर्ण रत्नागिरी जिल्हा त्याचप्रमाणे मुंबई व अन्य भागात देखील त्यांच्या जाकडीनृत्याचे सामने झालेले आहेत. जाकडी ही नृत्यकला थेट लोकांपर्यंत लोकांच्यामध्ये जाऊन सादरीकरण करण्याची कला असल्याने त्या माध्यमातून जनप्रबोधन आणि सामाजिक प्रबोधन देखील चांगल्या प्रकारे होऊ शकते असा विश्वास देखील शाहीर मसणे यांनी व्यक्त केला आहे.