सावंतवाडी : सावंतवाडी येथील माजी सैनिक बापू सिताराम गावडे (८५ , रा. सर्वोदय नगर ) यांचे रविवारी वार्धक्याने दुःखद निधन झाले. आरटीअरी रेजिमेंट सैन्यामध्ये त्यांनी सेवा बजावली होती. उत्कृष्ट मुष्टीयोद्धा आणि प्रशिक्षक म्हणून ते परिचित होते. त्यांच्या पश्चात दोन मुलगे सैन्यात असून विवाहित मुलगी ,सुना, जावई ,नातवंडे असा परिवार आहे. सायंकाळी स्मशानभूमी मध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले.