घराच्या मागे लाकडाच्या खोपीत आढळले बिबट्याचे पिल्लू

देवरुख | प्रतिनिधी : आज रोजी मौजे चिखली ता. संगमेश्वर तेथील श्री.समीर हुसैन हुजुरे ( चिखली मोहल्ला ) यांचे राहते घरा मागील बाजूस लाकडाच्या खोपी खाली बिबट्याचे पिल्लू बसले बाबत पोलिस पाटील श्री रुपेश विठ्ठल कदम यांनी परिमंडळ वनअधिकारी देवरूख श्री तौफिक मुल्ला यांना कळविले नुसार परिक्षेत्र वनअधिकारी रत्नागिरी श्री प्रकाश सुतार यांनी त्यांचे अधिनस्त वनकर्मचारी समवेत घटना स्थळी जाऊन पाहणी करता बिबट्याचे पिल्लू मोठ्या डालग्या खाली झाकून ठेवल्याचे दिसून आले अधिक चौकशी करता सदर पिल्लू हे घाबरलेल्या अवस्थेत पळण्याचा प्रयत्न करत होते ते विहिरी मध्ये पडेल म्हणून त्याला झाकून ठेवल्याचे पोलिस पाटील श्री.कदम यांनी सांगितले त्यानंतर सदर बिबट्याचे पिल्ल्याची पाहणी केली त्याचे अंगावर कोणतीही जखम दिसून आली नाही सदरचे पिल्लू हे मादी असून त्याचे वय अंदाजे 2 ते 3 महिने आहे तदनंतर सदर पिल्लास ताब्यात घेऊन पशुधन विकास अधिकारी देवरूख यांचे मार्फत तपासणी करून घेऊन ते अशक्त असलेचे पशुसंवर्धन अधिकारी यांनी सांगितले मुळे मानद वन्यजीव रक्षक रत्नागिरी श्री.निलेश बापट यांनी खात्री केली.त्यामुळे सदर बिबट्याचे पिल्लास उपचारा साठी वन्यप्राणी प्राथमिक उपचार केंद्र पुणे येथे तत्काळ पाठवणेत आले आहे सदरची कार्यवाही ही मा. विभागीय वनअधिकारी रत्नागिरी चिपळूण श्री दिपक खाडे, सहाय्यक वनसंरक्षक चिपळूण श्री वैभव बोराटे यांचे मार्गदर्शनाखाली परिक्षेत्र वनअधिकारी रत्नागिरी श्री प्रकाश सुतार परिमंडळ वनअधिकारी देवरूख श्री तौफिक मुल्ला करत आहेत.
अशाप्रकारे वन्यजीव अडचणीमध्ये सापडल्यास वनविभागाचा टोल फ्री क्रमांक 1926 किंवा 9421741335 या क्रमांकावर संपर्क करणेबाबत आवाहन वनविभागामार्फत करण्यात येत आहे.
प्रकाश सुतार वनपरिक्षेत्र अधिकारी रत्नागिरी