गुळदुवे गावात बिबट्याची मोठी दहशत

ग्रामपंचायत सदस्य देवेंद्र शेटकर बालबाल बचावले

सातार्डा । प्रतिनिधी :

सावंतवाडी तालुक्यातील गूळदुवे येथील गावात बिबट्या दृष्टीस पडत आहे. येथील ग्रामस्थांच्या कुत्र्यावर हल्ला केला असतानाच गुळदुवे येथील ग्रामपंचायत सदस्य देवेंद्र शेटकर हे आपले काम आटोपून मळेवाड येथून जात असताना मळेवाड गुळदुवे येथील सीमेलगत रस्त्याच्या कडेला असलेल्या बिबट्याने अचानक शेटकर यांच्या गाडी वर झेप घेतली. यावेळी त्यांनी काही सेकंदातच गाडी पुढे घेतल्यामुळे बिबट्याच्या हल्यातून शेटकर सुटले मात्र त्यांचा थरकाप उडाला. बिबट्याच्या या वावरामुळे येथील ग्रामस्थांत भीतीचे वातावरण पसरले आहे.

दरम्यान, या गावात रस्त्याच्या दोन्ही बाजुला झाडी वाढल्यामुळे बिबट्या किंवा अन्य प्राणी या झाडीमुळे सहसा कोणाच्या दृष्टीस पडत नाही. अशामुळे ग्रामस्थांवर किंवा पाळीव प्राण्यांना या जंगली प्राण्यांचा हल्ला होण्याची दाट शक्यता आहे.तरी संबंधित खात्याच्या अधिकाऱ्यांनी याची दखल घेऊन कार्यवाही करण्यात यावी, अशी मागणी स्थानिक ग्रामस्थांमधून होत आहे.

Sindhudurg