Death of Prabhakar alias Bal Borkar
कालवश
रत्नागिरी जि.प. चे सेवानिवृत्त कर्मचारी
श्री. प्रभाकर उर्फ बाळ गणेश बोरकर यांचे अल्पशा आजाराने दि. ४ मे २३ रोजी दुखद निधन झाले. निधन समयी ते ७५ वर्षाचे होते. निस्वार्थ व सेवाभावी मनोभावी वृत्तीने ते समाजाचे सर्व स्तरात सुपरिचित होते. ते इंडियन रेडक्रॉसची रक्तपेढी, रिमांड होम, राष्ट्रीय सेवा समिती इत्यादी अनेक संस्थांमध्ये निष्ठापूर्वक कार्यरत होते. तसेच ते उत्स्फूर्त कविता करायचे. कोकण मराठी साहित्य परिषदेतर्फे त्यांचा सत्कार केला होता. त्यांचे आकस्मिक निधनाने हळहळ व्यक्त होत आहे. त्यांचे पश्चात पत्नी,मुलगा,सून,मुलगी, जावई, नातू, बंधू, भगिनी असा परिवार आहे.