सावंतवाडी नगरपालिकेच्या स्विमिंग पूल मध्ये बुडून चराठ्यातील मुलाचा मृत्यू

Charatha boy dies after drowning in Sawantwadi Municipality swimming pool

सावंतवाडी । प्रतिनिधी : सावंतवाडी नगरपालिकेच्या जिमखाना येथील स्विमिंग पूल मध्ये पोहण्यासाठी उतरलेल्या ग्लेन जॉनी डिसोजा रा. चराठा या सतरा वर्षीय मुलाचा बुडून मृत्यू झाला. ही घटना रविवारी संध्याकाळी पाच वा. घडली. याबाबत तातडीने त्याला उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले मात्र वैद्यकीय अधिकारी यांनी त्याला मृत घोषित केले. याबाबत पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्युची नोंद करण्यात आली आहे.
सावंतवाडी जिमखाना येथे नगरपालिकेचे पोहण्यासाठी स्विमिंग पूल आहे. रविवारी संध्याकाळी चराठा येथील ग्लेन डिसोजा हा मुलगा पोहण्यासाठी तिथे आला होता. त्याने स्विमिंग पूल मध्ये उडी घेतली त्यानंतर तो वर आलाच नाही. काही वेळाने ही बाब तिथे असलेल्या प्रशिक्षकाच्या निदर्शनास येताच त्याने तातडीने पाण्यात उडी घेत त्याला बाहेर काढले व उपचारासाठी येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले.

यावेळी वैद्यकीय अधिकारी यांनी त्यांची तपासणी केली असता त्याचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले. ही घटना समजताच प्रभारी सावंतवाडी पोलिस निरीक्षक अधिकारे, पोलिस उपनिरीक्षक यशवंते यांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. सदर मुलगा हा स्विमिंग शिकण्यासाठी तिथे आला होता. त्याला नीट पोहता येत नव्हते त्यामुळे ही घटना घडली असावी असा अंदाज पोलिसांनी वर्तविला आहेयाबाबतची माहिती मिळाल्यानंतर जराटा येथील ग्रामस्थ आणि पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी मोठ्या प्रमाणात उपजिल्हा रुग्णालयात गर्दी केली होती त्याच्या या मृत्यूमुळे हळहळ व्यक्त करण्यात येत आहे त्याच्या पश्चात आई-वडील असा
त्याच्या पश्चात आई-वडील असा परिवार आहे.