मालवण तालुका खरेदी विक्री संघ निवडणूक भाजपा १५ जागांपैकी १५ जागांवर विजयी
महाविकास आघाडीचा दारुण पराभव
मालवण : मालवण तालुका सहकारी खरेदी विक्री संघ निवडणुकीत भाजप पुरस्कृत श्री देव रामेश्वर, नारायण, सातेरी सहकार विकास पॅनेलने १५ ही जागांवर बहुमताने विजय मिळवला. महाविकास आघाडी पुरस्कृत पॅनेलचे सर्व उमेदवार पराभूत झाले.
दरम्यान, विजयानंतर भाजपने जल्लोष केला. फटाक्यांची आतिषबाजी झाली. भाजप प्रदेश सचिव माजी खासदार निलेश राणे यांनी मालवण येथे दाखल होत सर्व विजयी उमेदवारांचे अभिनंदन केले. शंभर टक्के स्वरूपात मिळालेल्या या विजयाने मी भावुक झालो. या विजयाची माहिती केंद्रीय मंत्री नारायण राणे साहेब यांना दिली. त्यांनाही आनंद झाला. या विजयाचे श्रेय तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर व तालुक्यातील सर्व भाजप पदाधिकारी कार्यकर्ते यांचे आहे. आगामी सर्व निवडणुकीत विजयाची ही पताका अशीच फडकत राहील. असे निलेश राणे म्हणाले.
केंद्रीय मंत्री नारायण राणे, पालकमंत्री रवींद्र चव्हाण, भाजप प्रदेश सचिव निलेश राणे, जिल्हाध्यक्ष राजन तेली यांच्या नेतृत्व व मार्गदर्शनाखाली मिळालेला हा विजय आहे. तालुक्यातील सर्व भाजप पदाधिकारी, कार्यकर्ते यांचे हे विजयी श्रेय आहे. निलेश राणे यांच्या मार्गदर्शनाखाली काम करत असताना तालुक्यात कोणतेही गटातटाचे राजकारण न ठेवता सर्वाना एकत्र घेऊन आगामी ग्रामपंचायत, नगरपालिका, जिल्हापरिषद, पंचायत समिती निवडणुकीत ही विजयी वाटचाल कायम राहील. २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत निलेश राणे यांच्या विजयाची ही नांदी आहे. असे तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर म्हणाले.
एकूणच कै. सुनील मलये पॅनेलचे उमेदवार यांना भाजप पॅनेल मध्ये सोबत घेत तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर यांची सर्व ठिकाणी केलेली यशस्वी शिष्ठाई भाजपचा विजय निश्चित करणारी ठरली. निलेश राणे यांनीही धोंडी चिंदरकर व सर्व पदाधिकारी कार्यकर्ते यांचे कौतुक केले. भाजपचा हा विजय कै. सुनील मलये यांना श्रद्धांजली आहे. असे निलेश राणे म्हणाले.
यावेळी भाजप जिल्हा सरचिटणीस अशोक सावंत, तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर, जिल्हा बँक संचालक बाबा परब, माजी नगराध्यक्ष सुदेश आचरेकर, माजी नगरसेवक दीपक पाटकर, विजय केनवडेकर, माजी उपसभापती राजू परुळेकर, माजी वित्त बांधकाम सभापती महेंद्र चव्हाण, मोहन वराडकर, गणेश कुशे, आप्पा लुडबे, संजय नाईक, सुमित सावंत, चारुशीला आचरेकर, पूजा करलकर, पूजा सरकारे, ललित चव्हाण, सौरभ ताम्हणकर, राकेश सावंत, राजू बिडये, भाई मांजरेकर, संतोष गावकर, दीपक सुर्वे, निनाद बांदेकर यासह अन्य पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.
भाजप पुरस्कृत पॅनेल विजयी उमेदवार (संस्था मतदारसंघ एकूण २९ मते)
महेश बाळकृष्ण मांजरेकर (२० मते)
प्रफुल्ल वासुदेव प्रभू (१९ मते)
राजन जगन्नाथ गांवकर (१८ मते)
कृष्णा पांडुरंग चव्हाण (२० मते)
अभय सखाराम प्रभुदेसाई (१९ मते)
राजेंद्र नारायण प्रभुदेसाई (१९ मते)
इतर मागास : कृष्णा ढोलम (७८७ मते) विजयी
व्यक्ती मतदार विजयी उमेदवार
रमेश (आबा) हडकर (५८३)
विजय ढोलम (६७२)
गोविंद गावडे (६२२)
महेश गावकर (६१५)
महिला मतदारसंघ
सरोज शिवाजी परब (६७५)
अमृता अशोक सावंत (६३३)
अनुसूचित जाती जमाती
सुरेश चौकेकर (७१५ मते)
भटक्या विमुक्त जाती जमाती
अशोक तोडणकर (७२५)
निवडणुकीत कृष्णा ढोलम हे सर्वाधिक मते घेत विजयी ठरले. त्यांच्या विजयानंतर पत्रकार यांनीही जल्लोष केला. तर महाविकास आघाडी चे जिल्हा बँक संचालक मेघनाद धुरी पराभूत. माजी नगराध्यक्ष अशोक तोडणकर यांनी त्यांचा दारुण पराभव केला. खरेदी विक्री संघ येथे मतमोजणी पार पडली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून अजय हिर्लेकर यांनी काम पाहिले.
Sindhudurg