परीट समाज जिल्हाध्यक्ष दिलीप भालेकर राष्ट्रीय समाजभूषण पुरस्काराने सन्मानित

सावंतवाडी । प्रतिनिधी : अखिल भारतीय धोबी अर्थात परिट महासंघातर्फे रायगड रोहा येथील ज्येष्ठ नागरिक सभागृहात परीट समाजाचे सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष दिलीप भालेकर यांना राष्ट्रीय समाजभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

हा पुरस्कार सन्मानपत्र, सन्मानचिन्ह, शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन अखिल भारतीय राष्ट्रीय अध्यक्ष कृष्णकुमार कनोजिया, वरिष्ठ राष्ट्रीय उपाध्यक्ष एकनाथराव बोरसे, राष्ट्रीय नेते राजेंद्रशेठ आहेर, महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष शांतारामभाऊ कदम यांच्या हस्ते परीट समाज जिल्हाध्यक्ष दिलीप भालेकर यांना प्रदान करण्यात आला.

यावेळी महाराष्ट्र राज्याचे युवा अध्यक्ष संतोष भालेकर, कोकण विभागीय अध्यक्ष नंदकुमार राक्षे, रत्नागिरी जिल्हाध्यक्ष दीपक कदम, रायगड जिल्हाध्यक्ष किशोर वासकर, नंदुरबारचे ॲड. जगदीश कुवर, अहमदनगरचे दिलीप आरगटे, सोलापूरचे दत्तात्रेय काटकर, रायगडच्या महिला अध्यक्षा भारतीताई जाधव, सिंधुदुर्गच्या दिपाली भालेकर आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी राष्ट्रीय अध्यक्ष कृष्णकुमार कनोजिया, वरिष्ठ राष्ट्रीय उपाध्यक्ष एकनाथराव बोरसे, राष्ट्रीय नेते राजेंद्रशेठ आहेर, महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष शांताराम भाऊ कदम आदींनी मनोगत व्यक्त केले.

या सत्काराप्रसंगी परीट समाज जिल्हाध्यक्ष दिलीप भालेकर म्हणाले की, मी गेली ३० वर्षे परीट समाजासाठी काम करत आहे त्याची ही पोच पावती मिळाली व हा पुरस्कार सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मला काम करण्यासाठी प्रोत्साहन देणाऱ्या ज्येष्ठ व श्रेष्ठ सर्व समाज बंधू-भगिनींना समर्पित करतो. मी यापुढेही समाज उन्नतीसाठी जे करता येईल ते तन-मन-धनाने करण्याचा प्रयत्न करीन, असेही त्यांनी स्पष्ट केले. यावेळी परीट समाजातील देशभरातून बंधू भगिनी उपस्थित होते.

Sindhudurg