माखजन l वार्ताहर :
संगमेश्वर तालुक्यातील आंबव पोंक्षे गावात ग्राम स्वछता अभियान राबविण्यात आले.आंबव पोंक्षे ग्रामपंचायत व आंबव पोंक्षे जिल्हा परिषद शाळा यांच्या सहयोगाने उपक्रम झाला.
प्रशालेतील मुलांनी प्लास्टिक मुक्तीचा नारा देत प्रभात फेरी काढली.ग्रामस्थ एकत्र येत गावातील मुख्य रस्त्याच्या आजूबाजूला पडलेले प्लास्टिक एकत्र केले.व परिसर स्वछ केला.
यावेळी सरपंच शेखर उकार्डे,उपसरपंच मंगेश मांडवकर,आंबव पोंक्षे शाळेच्या मुख्याध्यापिका सौ प्राची पाटणकर,अंगणवाडी सेविका वेदीका भायजे,वैदेही तांबे,पोलीस पाटील सोनाली जाधव,सौ कुडतडकर, सुप्रिया सुतार,माजी सरपंच व विद्यमान ग्रामपंचायत सदस्य प्रिया सुवरे,ग्रामसेविका लक्ष्मी गावित,संध्या सुतार,शशिकांत घडशी, आदींसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.