वैष्णवी आंबेरकरला एस टी एस परीक्षेत ब्रॉंझ मेडल

Bronze medal to Vaishnavi Amberkar in STS examination

सावंतवाडी | प्रतिनिधी : जि.प.शाळा , नेमळे नं.२ ची इयत्ता दुसरीची विद्यार्थीनी वैष्णवी मिलिंद आंबेरकर हिला युवा संदेश प्रतिष्ठान , नाटळ सांगवे आयोजित सिंधुरत्न टॅलेंट सर्च परीक्षेत ब्रॉन्झ मेडल प्राप्त झाले आहे. तिच्या या यशाबद्दल केंद्रप्रमुख श्री.प्रमोद पावसकर तसेच शा. व्य. समिती अध्यक्ष श्री. संदीप नागवेकर आणि इतर सदस्य यांनी तिचे अभिनंदन केले आहे. तिला शाळेच्या मुख्या. श्रीम.प्राची कासार आणि वर्गशिक्षक श्री.महेश सावंत यांचे मार्गदर्शन लाभले.