हर्ष घाडीगावकर ची तिसऱ्या राज्यस्तरीय योगासन स्पोर्ट्स स्पर्धेसाठी निवड!

Google search engine
Google search engine

 

फ्लोरेट कॉलेज इटेरियर अँड फॅशन डिझायनिंग कणकवलीचा विध्यार्थी

मसुरे | झुंजार पेडणेकर

महाराष्ट्र योगासन स्पोर्ट्स असोसिएशन आयोजित तिसऱ्या राज्यस्तरीय योगासन स्पोर्ट्स स्पर्धेसाठी सब ज्युनिअर वयोगटातून फ्लोरेट कॉलेज कणकवली चा हर्ष घाडीगावकर यांची निवड करण्यात आली आहे. सदर स्पर्धा ही वर्ल्ड पिस स्कूल चाकण आळंदी रोड हनुमान वाडी एमआयटि आळंदी पुणे येथे आयोजित करण्यात आली आहे. हर्ष घाडीगावकर हा इंटेरियरच्या प्रथम वर्षामध्ये शिकत आहे. त्याच्या निवडीबद्दल फ्लोरेट कॉलेज कणकवलीच्या वतीने सार्था कदम ,सचिन बोराटे, अमेय पारकर, अक्षयी येडवे, सायली तळवडेकर, स्नेहा कामत, मनिषा देसाई व सर्व विद्यार्थी यांनी हर्ष घाडीगावकरचे अभिनंदन केले आहे. हर्षला पुढील स्पर्धेसाठी कॉलेजच्या वतीने शुभेच्छा देण्यात आल्या . त्याला कोच संजय भोसले यांचे मार्गदर्शन लाभले .