कोल्हापुरातून पहिल्यांदाच रात्रीच्या विमानाचे ‘तिरूपती’कडे उड्डाण

Google search engine
Google search engine

उद्योग मंत्री उदय सामंत कुटुंबियांसह रवाना

कोल्हापूर । प्रतिनिधी : कोल्हापूर विमानतळाच्या विस्तारीकरणातील महत्त्वाचा टप्पा असलेली नाइट लँडिंग सुविधा नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात उपलब्ध झाली. या सुविधेचा प्रत्यक्षात वापर रविवारी झाला. रविवारी रात्री ८ वाजून ४६ मिनिटांनी याविमानतळावरून पहिल्यांदाच रात्रीचे उड्डाण तिरूपतीला जाणाऱ्या खासगी विमानाचे झाले. उद्योगमंत्री उदय सामंत आणि त्यांचे कुटुंबीय तिरूपतीला या विमानाने रवाना झाले.

‘डीजीसीए’च्या परवानगीनंतर आणि एपीआय प्रणालीवर विमानतळाची माहिती प्रसिद्ध झाल्याने विमानतळ व्यवस्थापनाने ३ नोव्हेंबरपासून विस्तारित धावपट्टीचा वापर आणि नाइट लँडिंग सुविधेचा प्रारंभ केला. मात्र, नाइट लँडिंग अथवा टेकऑफसाठी कोणत्याही विमान कंपनी अथवा खासगी विमान वापरकर्त्यांनी परवानगी मागितली नव्हती.त्यानंतर राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी तिरूपतीला जाण्यासाठी रविवारी विमानाचे नाईट टेकऑफ करणार असल्याची माहिती विमानतळ व्यवस्थापनाला शनिवारी दिली. त्यानुसार व्यवस्थापनाने तयारी केली होती.