मनोहर मनसंतोष गडाच्या शिवापूरमार्गे वाटेवर बसवली चार बाकं

Google search engine
Google search engine

दुर्ग मावळा प्रतिष्ठान कोकण विभागाचा आदर्शवत उपक्रम

सावंतवाडी । प्रतिनिधी :

दुर्ग मावळा प्रतिष्ठान कोकण विभागतर्फे मनोहर मनसंतोष गडावरील शिवापूरमार्गे जाणाऱ्या वाटेवर तीन व गडावरील औदुंबराच्या झाडाखालील मूर्त्यांच्या परिसरात एक असे चार बाक बसवून मान्यवरांच्या हस्ते त्यांचे अनावरण करण्यात आले.

गतवर्षी पहिल्या टप्प्यात गोठवेवाडीमार्गे मनोहर मनसंतोष गडावर जाणाऱ्या वाटेवर सहा बाक बसविण्यात आलेले होते. यावर्षी शिवापूरमार्गे गडावर जाणाऱ्या वाटेवर बाक बसविण्याचे नियोजन करण्यात आलेले होते. त्यानुसार रविवारी चार बाक बसविण्यात आले.

या उपक्रमासाठी सोहर्ष विजय खानोलकर यांनी एक बाक, तसेच बापू अर्जुन मेस्त्री, अजित कविटकर, बाबाजी परब, जया सावंत, परेश सावंत, संदिप कुडतरकर, ज्ञानेश्वर सावंत, दर्शना लांबर, माऊली फर्निचर माणगाव, आनंद कर्पे, संदिप रामदास चव्हाण, राजन भाऊ वालावलकर, हर्ष शिवाप्रसाद मुळीक, स्वाती कविटकर, प्रज्ञा दळवी, भरत झोरे, प्रीती सावंत, कल्पना राणे, रश्मी सावंत, योगिता शेडगे, चारुशीला वारंग, प्रविण सुरेश सूद, नारायण जयराम परब, गणेश नाईक, प्रकाश कडव, तुकाराम घावरे, विद्या राऊळ यांनी आर्थिक सहाय्य केले. खडी व वाळू साठी संजय कविटकर यांनी सहकार्य केले.

सदर अनावरण कार्यक्रमासाठी उपशिक्षणाधिकारी रामचंद्र आंगणे साहेब, दुर्ग मावळा प्रतिष्ठान (महाराष्ट्र राज्य) चे अध्यक्ष प्रकाश कावले, रोहित पाटील, राकेश डोगरे, वसंत नाना शेडगे, रमेश नाना गुंजाळ, शिवापूर सरपंच यशवंत शंकर कदम, वकील सुधीर राऊळ, माजीसैनिक चंद्रशेखर जोशी, हेमांगी जोशी, तुकाराम गुंजाळ, दशरथ कडव, अनिल बांग, शिक्षक संघ जिल्हाध्यक्ष राजाराम कविटकर, दुर्ग मावळा प्रतिष्ठान कोकण विभाग चे अध्यक्ष गणेश नाईक, सरचिटणीस सुनिल करडे, सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष प्रसाद सुतार, समीर धोंड, समील नाईक, पंकज गावडे, मनोहर गड संवर्धन प्रमुख रोहन राऊळ, प्रणय राऊळ, शिवाजी परब, संकेत सावंत, योगेश येरम, स्वप्निल पालकर, दयानंद आंबावले इत्यादी उपस्थित होते.

विशेष कौतुक म्हणजे या मोहिमेला शिवापूर गडकरीवाडी येथील ८१ वर्षाचे आजोबा सहभागी झालेले होते. सर्व सहभागी मावळ्यांचे तसेच प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या सहकार्य करणाऱ्या सर्व व्यक्तींचे दुर्ग मावळा प्रतिष्ठान तर्फे आभार मानण्यात आले.

Sindhudurg