संगमेश्वर-बोरसूत येथे १४ मे रोजी जिल्हास्तरीय जलसा गीत गायन स्पर्धेचे भव्य आयोजन

Grand organization of district level jalsa singing competition at Sangameshwar-Borsut on 14th May

जाकादेवी | वार्ताहर :  संगमेश्वर तालुक्यातील समता मंडळ मौजे बोरसूत ग्रामीण व मुंबई तसेच माता रमाई महिला मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने संगमेश्वर तालुक्यातील मौजे बोरसूत येथे रविवार दि.१४ मे रोजी रात्री ८ वा. जिल्हास्तरीय जलसा गीत गायन या लक्षवेधी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.विश्वशांतीदूत भगवान गौतम बुद्ध यांच्या तसेच विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंतीचे औचित्य साधून या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.जिल्ह्यातील प्रबोधनकारी जलसाकार मंडळांच्या जुन्या व होतकरू कलाकारांना प्रोत्साहन देण्यासाठी व बुद्ध ,शिवराय, फुले, शाहू, आंबेडकरी वैज्ञानिक विचारधारा नव्या पिढीवर बिंबविण्याच्या हेतूने ही स्पर्धा महत्त्वाची मानली जात आहे.

या स्पर्धेत रत्नागिरी जिल्ह्यातील २० जलसाकार मंडळांना प्रवेश देण्यात येणार आहे. या स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावणाऱ्या विजेत्यास रोख रू. ८ हजार रुपये ,द्वितीय क्रमांकास ५ हजार रुपये, तृतीय क्रमांकास ३ हजार रुपये सन्मानपत्र व गौरवपत्र,तसेच उत्तेजनार्थ पारितोषिक रू.१५००/- दिले जाणार असून याशिवाय उत्तम ढोलकीपटू, उत्तम निवेदक ,उत्तम हार्मोनियम वादक, उत्तम गायक अशी विविध प्रेरक बक्षीसं या स्पर्धेत ठेवण्यात आली आहेत. तरी ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी मौजे बोरसूत समता मंडळ ग्रामीण मुंबई व माता रमाई महिला मंडळ, तरुण मंडळ खूप मेहनत घेत आहेत.इच्छूक जलसा मंडळांनी या जिल्हास्तरीय स्पर्धेत सहभागी होण्याचे आवाहन समता मंडळाचे विद्यमान अध्यक्ष संदीप गमरे (9404993005) यांनी केले आहे