Brown heroin smuggling found at Ratnagiri railway station; One arrested
रत्नागिरी : प्रतिनिधी : रत्नागिरी रेल्वेस्टेशन प्लॅटफॉर्म नं1 वर ब्राउन हेरॉईन या अंमली पदार्थाची तस्करी करणार्या संशयिताच्या शहर पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाने मंगळवारी मुसक्या आवळल्या. मोहसिन अब्दुल गणी शेख (36,रा.चर्च रोड मच्छिमार्केट,रत्नागिरी) असे अटक करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे.त्याच्याकडून एकूण 450 टर्की पावड असलेल्या कागदी पुड्या मिळून आल्या.त्याची प्राथमिक रासायनिक तपासणी केली असता त्यामध्ये 12.8 ग्रॅम ब्राउन हेरॉईन हा अंमली पदार्थ मिळून आला.मागील काही दिवसात रत्नागिरी जिल्हयात काही तरुण अंमली पदार्थांची खरेदी-विक्री करत असल्याची खात्रिशिर माहिती पोलिस विभागाला मिळाली होती.त्या अनुषंगाने पोलिस अधिक्षक धनंजय कुलकर्णी यांनी रत्नागिरी शहरात अंमली पदार्थ विरोधी कारवाई करण्याचे निर्देश दिले होते.तसेच अपर पोलिस अधिक्षक जयश्री गायकवाड,उपविभागीय पोलिस अधिकारी सदाशिव वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली शहर पोलिस निरीक्षक विनित चौधरी यांनी शहर पोलिस ठाण्याचे गुन्हे प्रकटीकरण पथकाचे अधिकारी व अंमलदार यांना सूचना दिल्या होत्या.
या पथकामार्फत अंमली पदार्थ खरेदी-विक्री करणार्यांबाबत गोपनीय माहिती घेण्याचे काम सुरु होते.मंगळवारी शहर पोलिस ठायाचे गुन्हे प्रकटीकरण पथकातील पोलिस उपनिरीक्षक आकाश साळुंखे व पोलिस अंमदलार शहरातील विविध भागांमध्ये पेट्रोलिंग करत होते.तेव्हा रत्नागिरी रेल्वेस्टेशन परिसरातील प्लॅटफॉर्म नं.1 वरुन पार्सल गेटने पार्किंगकडे एक तरुण जाताना त्यांना दिसून आला.त्याच्या पाठीवर एक सॅक होती आणि त्याच्या हालचाली संशयास्पद वाटल्याने या पथकाने त्याला थांबवून त्याची चौकशी केली.तेव्हा त्याच्या जिन्स पॅन्टच्या उजव्या खिशात 5 पारदर्शक प्लास्टिक पिशव्या ज्यात 450 टर्की पावडर असलेल्या कागदी पुड्या मिळून आल्या.त्याच्याकडील सर्व मुददेमाल जप्त करण्यात आला असून त्याच्यावर शहर पोलिस ठाण्यात एन.डी.पी.एस अॅक्ट कलम 8 (क),22 (ब) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.ही कारवाई पोलिस उपिनिरीक्षक आकाश साळुंखे,पोलिस हेड काँस्टेबल प्रसाद घोसाळे,गणेश सावंत,प्रविण बर्गे,अमोल भोसले,पोलिस नाईक आशिष भालेकर,विनय मनवाल आणि रत्नकांत शिंदे यांनी केली असून अधिक तपास सुरु आहे.