६९वा अखिल भारतीय सहकारी सप्ताह १४ ते २० नोव्हेंबर कालावधीत साजरा होणार

Google search engine
Google search engine

 

सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी)

सिंधुदुर्ग जिल्हा सहकारी मंडळ सिंधुदुर्ग व सिंधुदुर्ग जिल्हा बँक यांचे वतीने ६९ वा अखिल भारतीय सहकारी सप्ताह १४ नोव्हेंबर ते २०नोव्हेंबर २०२२ या मुदतीमध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये सहकारी संस्थांच्या सहकार्याने साजरा करण्यात येणार आहे. सहकारी सप्ताहाची मुख्य संकल्पना सहकारी संस्थांची वाढ आणि भविष्यकालीन वाटचाल हि आहे.भारतीय राष्ट्रीय राष्ट्रीय सहकारी संघ नवी दिल्ली दिलेल्या विषया नुसार राज्य सहकार सहकार संघ पूणे व सहकार खाते यांच्या संयुक्त विद्यमाने संपूर्ण राज्यात सहकार सप्ताह कार्येक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये सर्वत्र सहकारी सप्ताहाचे आयोजन करण्यात येणार असून सर्व सहकारी संस्थांचे पदाधिकारी सभासद यांनी सहभागी होउन सहकार्य करून सहकार्य करावे असे आवाहन सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी व सिंधुदुर्ग जिल्हा सहकारी मंडळाचे अध्यक्ष गजानन गावडे यांनी केले आहे. १४ नोव्हेंबर २०२२रोजी सिंधुदुर्ग जिल्हा सहकारी मंडळ ओरोस,१५ नोव्हेंबर कुडाळ पंचक्रोशी विकास संस्था कुडाळ,१६नोव्हेंबर देवगड तालुका माध्यमिक शिक्षक कर्मचारी सहकारी पतसंस्था,शिरगांव दत्तनगर.ता. देवगड, १७नोव्हे.अनिल सहकारी गृहतारण संस्था कणकवली,१८नोव्हें. महीला काथ्या कामगार औद्योगीक सहकारी संस्था वेंगुर्ला-वेंगुर्ला कँप,१९नोव्हे.गोठणे ग्रुप विकास संस्था गोठणे.ता मालवण,२०नोव्हेंबर सिंधुदुर्ग जिल्हा बँक लि,सावंतवाडी वरिलप्रमाणे सिंधुदुर्ग जिल्ह्यात सहकारी सप्ताहाचे कार्येक्रम साजरे होणार आहेत.