राजापूर | प्रतिनिधी : राज्याच्या मंत्रीमंडळात कॅबिनेट मंत्री म्हणून शपथ घेतल्यानंतर नागपूर अधिवेशनातुन कोकणात येणाऱ्या राज्याचे कॅबिनेट मंत्री नितेश राणे रविवारी २२ डिसेंबर रोजी राजापुरात येत असून यावेळी राजापूरार महायुतीच्या वतीने त्यांचे जंगी स्वागत केले जाणार आहे.
रविवारी सकाळी ९ वाजता नितेश राणे हे हॅलिकॉप्टरने राजापूर रानतळे येथील हॅलिपॅडवर दाखल होणार आहेत. या ठिकाणी त्यांचे भाजपासह महायुती व समस्त राजापूर वासीयांच्या वतीने जंगी स्वागत केले जाणार आहे. यानंतर ते राजापूर येथून महामार्गावरून सिंधुदुर्गकडे रवाना होणार आहेत. यावेळी महामार्गावर तसेच सिंधुदुर्ग जिल्हयाच्या प्रवेशद्वारावर खारेपाटण येथेही ना. राणे यांचे जंगी स्वागत केले जाणार आहे.
यावेळी भाजपासह महायुतीच्या सर्व पदाधिकारी कार्यकर्ते रानतळे हेलिपॅड येथे उपस्थित रहावे असे आवाहन भाजपा तालुका अध्यक्ष सुरेश गुरव, भास्कर सुतार व महायुतीच्या वतीने करण्यात आले आहे. यांनी केले आहे.












