ख.वि.संघाचे नवनिर्वाचित संचालक विनायक राऊळ यांचा मळगांव ग्रामपंचायततर्फे सत्कार

सावंतवाडी । प्रतिनिधी : सावंतवाडी खरेदी विक्री संघाच्या नूकत्याच पार पडलेल्या निवडणूकीत भाजपा आणि बाळासाहेबांची शिवसेना पक्षाच्या श्री देव पाटेकर सहकार परिवर्तन पॅनलमधून निवडून आलेले नवनिर्वाचित संचालक विनायक राघोबा राऊळ यांचा मळगाव ग्रामपंचायततर्फे सत्कार करण्यात आला. मळगाव सरपंच सौ.स्नेहल जामदार व उपसरपंच हनुमंत पेडणेकर यांनी त्यांचे अभिनंदन करीत पूढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

यावेळी मळगांव पोलीस पाटील रोशनी जाधव, ग्रामपंचायतचे माजी सदस्य गजानन सातार्डेकर, गुरूनाथ गावकर, सामाजिक कार्यकर्ते विश्वनाथ गोसावी, गुरूनाथ राउळ, सुखदेव राउळ आदी उपस्थित होते.

Sindhudurg