ग्रामपंचायत निवडणुकी संदर्भात उद्या तहसीलदार कार्यालयात राजकीय पक्षांची बैठक..!

सर्व राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींना उपस्थित राहाण्याचे कणकवली तहसीलदारांनी केले आवाहन

कणकवली I मयुर ठाकूर : कणकवली तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकी संदर्भात उद्या १५ नोव्हेंबर रोजी सकाळी १०.३० वाजता सर्वच राजकीय पक्षांची बैठक बोलावली असून या बैठकीत ग्रामपंचायत निवडणुकीच्या कार्यक्रमाची माहिती व आदर्श आचारसंहितेचे पालन यासंदर्भात मार्गदर्शन आयोजित केले असल्याचे निवडणूक अधिकारी आर जे पवार यांनी सांगितले.

A meeting of political parties will be held tomorrow at the Tehsildar office in connection with the Gram Panchayat elections..!

त्यासाठी सर्वच राजकीय पक्षांना पत्र देखील पाठवण्यात आली असून त्यामध्ये राज्य निवडणूक आयोग यांचे आदेशान्वये ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणूक २०२२ साठी निवडणूक कार्यक्रम जाहीर झालेला आहे. तरी संपूर्ण कणकवली तालुक्यामध्ये निवडणूक कार्यक्रम घोषीत झाल्याच्या दिनांका पासून निवडणूक आचार संहिता लागू होईल. ही आचारसंहिता निवडणूकीचा निकाल जाहीर होईपर्यंत अंमलात राहील. सदर आचारसंहितेबाबत चर्चा व माहिती देण्यासाठी दिनांक १५ नोव्हेंबर रोजी सकाळी १०:३० वाजता तहसिलदार कार्यालय, कणकवली येथे सभा आयोजित करण्यात आली आहे. तरी सभेला उपस्थित रहावे. असे आवाहन कणकवली निवडणूक अधिकारी तथा तहसिलदार आर .जे. पवार यांनी केले आहे.