परिवर्तन पॅनलचे संचालक सभा व प्रवास भत्ता घेणार नाहीत! ८ टक्के दराने २५ लाखाचे कर्ज देणार!

Directors of the transformation panel will not take meeting and travel allowance! Will give a loan of 25 lakhs at 8 percent rate!

शिक्षक सभासदांनी २२ वर्षानंतर पुन्हा आमच्याकडे सत्ता द्यावी: शिक्षक नेते म.ल. देसाई

सिंधुनगरी | प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्था, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षकांची ही सहकारी संस्था आहे! प्राथमिक शिक्षक सभासद या संस्थेचे मालक आहेत. या संस्थेची शान आणि शिक्षक सभासदांचा सन्मान वाढेल असे काम आठ शिक्षक संघटना सहभागी असलेल्या परिवर्तन सहकार पॅनल आगामी काळात काम करणार आहे. आमचे पॅनलचे संचालक निवडून आले तर पहिल्याच सभेत आम्ही आठ टक्के दराने 25 लाखापर्यंत चे कर्ज मालक सभासदांना देऊ! तसेच संचालकांच्या सभा व प्रवास भत्त्याचा खर्च न करता शिक्षक सभासदांची ही जीवनदायीनी म्हणून ही संस्था आम्ही आणखी मोठे करु, आमचा निवडणुकीचा जाहीरनामा नाही तर हा वचननामा आहे! यासाठी जिल्ह्यातील सर्वच शिक्षक सभासदांनी परिवर्तन सहकार पॅनेलला मतदान करा अशी विनंतीपूर्वक मागणी या परिवर्तन सहकार पॅनलचे प्रमुख मला देसाई यांनी केली आहे.

या पॅनलचे प्रमुख श्री म.ल. देसाई अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष राजाराम कविटकर महाराष्ट्र राज्य शिक्षक भारतीचे अध्यक्ष संतोष पाताडे शिक्षक नेते के टी चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या पत्रकार परिषदेत या सर्वच शिक्षक नेत्यांनी सत्ताधारी पॅनेल व त्यांच्या नेतृत्वाचा समाचार घेतला. सभा आणि प्रवास भत्त्यात दरवर्षी केलेली पंधरा लाख खर्चाची उधळपट्टी, फर्निचर बदलण्याची आवश्यकता नसताना पुन्हा अनाठायी केलेला खर्च, सभासदांना फायदा व त्यांचे हीत जोपासण्याऐवजी संचालकांचे जेवण व त्यांचे हित जोपसण्यासाठी केलेला खर्च याचा समाचार घेतला. गेली बावीस वर्षे सत्ताधारी भाग्यलक्ष्मी पॅनल कडे सत्ता असून मालक सभासदांना कर्जावरती नऊ टक्के व्याजदर लादला गेला आहे. सर्वसायंसभेत आम्ही आवाज उठविला म्हणून तो पाव टक्का कमी करून पावणे नऊ टक्के वर आणला आहे. आमच्या परिवर्तन पॅनेल ची सत्ता आली तर पहिल्याच सभेत जे 22 वर्ष सत्ता उपभोगूनही भाग्यलक्ष्मी पॅनलला करता आले नाही ते काम आम्ही पहिल्याच संचालक मंडळाच्या सभेत करू, आमचे 15 ही संचालक सभा भत्ता व प्रवास भत्ता घेणार नाहीत.

आमच्या शिक्षक सभासदांचे हीत झोपण्यासाठी व त्यांच्या फायद्यासाठी आम्ही कर्जाचा व्याजदर आठ टक्के देऊ व 25 लाखाचे कर्ज वितरण करु हा निर्णय आम्ही पहिल्याच कार्यकारिणीच्या सभेत घेऊ असा आमचा वचननामा आहे असेही या शिक्षक नेत्यांनी जाहीर केले. या पत्रकार परिषदे वेळी बाबाजी झेंडे पुरुषोत्तम शेट्टी संदीप देसाई गजानन नाईक संजय जाधव सचिन जाधव आधी शिक्षक संघटनांचे पदाधिकारी व नेते उपस्थित होते.शिक्षकांची जीवनदायीनी असणारी ही पतसंस्था असून या संस्थेवर अध्यक्ष पदाधिकारी व संचालक हे शिक्षकच आहेत, या संस्थेचे सभासद ही शिक्षकच आहेत व या संस्थेवर काम करणारे कर्मचारी शिक्षकांचीच मुले आहेत. म्हणूनच या संस्थेला कोणतेही गालबोट लागू नये, या संस्थेची शान आणखी वाढावी म्हणून आम्ही सहकार वैभव पॅनलचे सर्व नेते मंडळी प्रयत्न करीत आहोत.

आरोप करून बदनामी करणे सोपे असते, राजकारण करून दुसऱ्या शिक्षक संघटनेला बदनाम करण्याचा काम आमचे नेते करणार नाहीत, या जिल्ह्यातील शिक्षकांची प्रतिमा व या सहकार संस्थेची शान आणखी वाढावी म्हणून आमचे नेते प्रयत्न करीत आहेत, यासाठीच आमचे पंधरा ही संचालक धडाडीचे सहकारी कामात अनुभव असलेले अभ्यासू पणे नेतृत्व करणारे शिक्षक संचालक पदासाठी या निवडणुकीत उभे केले आहेत. शिक्षक सभासदांचा या नेतृत्वावर विश्वास असल्याने विश्वास आणखी वाढत असल्यामुळे भाग्यलक्ष्मी पॅनलचे नेते घाबरले आहेत. या पतसंस्थेवरील आपली 22 वर्षाची कारकीर्द संपेल या भीतीने आमच्या संचालकांची व आमच्या नेत्यांची वैयक्तिक बदनामी त्यांनी सुरू केली आहे हे आमच्या शिक्षक सभासदांना ज्ञात झाले आहे. याबाबत उदाहरणासह या पत्रकार परिषदेत शिक्षक नेते व प्रचार प्रमुख म.ल. देसाई, के. टी.चव्हाण, राजाराम कविटकर, संतोष पाताडे या सर्वांनीच पतसंस्थेचा मागील कारभार वा आम्हाला संधी मिळाल्यास पुढील कारभार कसा असेल हे जाहीर केले.

काही महिला शिक्षकांना भाग्यलक्ष्मी पॅनलचे नेते दबाव तंत्राचा वापर करून आचारसंहितेचा भंग करीत असल्याचेही या नेत्यांनी सांगितले. मतदानानंतर फोटो काढा व तो पाठवा, आमच्या पॅनलला मतदान केले की नाही हे नारळावर शपथ घेऊन सांगा असा दबाव तंत्र महालक्ष्मी पॅनेल कडून सुरू असून शिक्षक सभासदांनी त्याला बळी पडू नये असे आवाहनही परिवर्तन पॅनलच्या नेत्यांनी केले आहे. वैयक्तिक बदनामी करून आमच्या संघटनेच्या बदनामीचा प्रयत्नही ते करीत आहेत, परिवर्तन पॅनल मध्ये बंडखोरी झाल्याचे ते सांगत असले तरी ही आमच्यात बंडखोरी नाही उलट अनेक शिक्षक संघटना या निवडणुकीत एकवटल्या आहेत, त्यांच्या संघटनेचे माजी जिल्हाध्यक्ष आमच्या संघटनेत दाखल झाले आहेत म्हणूनच आमच्यात बंडखोर झाली आहे हे सांगून सभासदांची ते दिशाभूल करत आहेत. एवढ्या संघटना सांभाळताना नाराजी ही असणारच आहे आणि ही नाराजी आमच्या पॅनल लपवून ठेवलेली नाही. ती जाहीरही केली आहे. उलट
महालक्ष्मी पॅनेलमध्ये चुकी नाराजी सुरू असून ते जास्त घातक असल्याचेही म.ल. देसाई व अन्य नेत्यांनी स्पष्ट केले.
शिक्षक नेते संतोष पाताडे यांची जिल्हा परिषदेच्या शिक्षण समितीवर निमंत्रित सदस्य म्हणून नेमणूक झाली ते आदरणीय केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या सूचनेवरून झाली होती, मात्र भाग्यलक्ष्मी पॅनलचे नेते आपल्या माहिती झाल्याचे सांगतात मग त्यानंतर ती नियुक्ती का झाली नाही? शिक्षक समितीची तेवढी धमक होती तर त्यानंतर शिक्षकांमधील निमंत्रित सदस्य का गेला नाही असा सवालही संतोष पाताडे यांनी व्यक्त केला. दोडामार्ग तालुक्यात झालेल्या भ्रष्टाचाराबाबत जे आरोप झाले त्याचे आपण समर्थन करणार नाही, मात्र जो प्रकार झाला त्याला सिंधुनगरी येथील मुख्य शाखेत सत्ताधारी संचालक हे व पदाधिकारी जबाबदार आहेत.

अशा व्यवहारावर त्यांनी लक्ष द्यायला हवे होते असेही म.ल.देसाई म्हणाले. मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी त्यांची कोणतेही वेतन वाढ थांबवलेले नाही किंवा त्यांच्यावर कारवाई झालेली नाही. हा वाद न्यायालयात सुरू असताना त्यासंदर्भातले कागदपत्र स्टेटसला झळकवून भाग्यलक्ष्मी पॅनलच्या नेत्यांनी बदनामी केली आहे याकडेही त्यांनी लक्ष वेधले. आम्ही कोणाची व्यक्तिशः बदनामी करत नाही, शिक्षक व आमच्या शिक्षक संघटनांचा जो आदर आहे जी शान आहे ते टिकवण्यासाठी ती वाढवण्यासाठी आमचा प्रयत्न आहे व तो आमच्याकडून कायम राहणार आहे भाग्यलक्ष्मी पॅनलचे नेते आमची अथवा आमच्या संघटनेच्या नेत्यांची व्यक्तीच्या बदनामी करत असतील तर आम्ही गप्प बसणार नाही, आमच्याकडे असलेले पुरावे आम्ही सादर करून त्यावरच बोलू असेही परिवर्तन सहकार पॅनलचे प्रमुख व शिक्षक नेते म.ल. देसाई, संतोष पाताडे, केटी चव्हाण, राजाराम कविटकर यांनी शेवटी जाहीर केले.

परिवर्तन सरकार पॅनलचे उमेदवार

परिवर्तन सहकार पॅनलचे तालुका कार्यक्षेत्र उमेदवार धर्मराज धुरत ( देवगड), दिनकर केळकर (वैभववाडी), रवींद्र जाधव (कणकवली), संतोष पाताडे (मालवण), राजाराम कविटकर (कुडाळ), सुभाष सावंत (सावंतवाडी), सागर कानजी (वेंगुर्ला), जिल्हा कार्यक्षेत्र उमेदवार अशोक साळुंखे व अरविंद पाळेकर (जिल्हा सर्वसाधारण पुरुष), श्रीमती नेहा सावंत व श्रीमती संचिता सावंत (जिल्हा सर्वसाधारण महिला) संतोष कोचरेकर (इतर मागास प्रवर्ग) अनिल वरक (भटक्या जाती विमुक्त जाती) मनोज कुमार आटक (अनुसूचित जाती जमाती) हे पॅनेल मध्ये उमेदवार असून शिक्षक सभासदांनी नारळ या चिन्हावर मतदान करून वचननामा असलेल्या या पॅनलला साथ द्यावी व या पॅनलला संधी द्यावी असे आवाहन शिक्षक नेते मला देसाई व अन्य शिक्षक संघटनांच्या नेत्यांनी केले आहे. या उमेदवारांना अपक्ष म्हणून सागर कांजे, कंबर व एकनाथ जानकर हे उमेदवार आहेत.

१४ मे मतदान १५ मे मतमोजणी! 2982 मतदार!

सिंधुदुर्ग जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्था या पतपेढीच्या पंधरा संचालक पदांसाठी रविवार दिनांक 14 मे 2023 रोजी सकाळी ८. ते संध्याकाळी ४. वा. या वेळेत निवडणूक होत असून 2982 शिक्षक मतदार आहेत. सत्ताधारी भाग्यलक्ष्मी पॅनेल विरुद्ध परिवर्तन सरकार पॅनल निवडणूक लढवत असून दुरंगी लढत होत आहे. पॅनेलने शक्ती प्रदर्शन केले असून भाग्यलक्ष्मी प्राण्यांना आपला जाहीरनामा जाहीर केला आहे तर परिवर्तन सहकार पॅनल ने आपला वचननामा जाहीर केला आहे. सुज्ञ शिक्षक मतदारानी या निवडणुकीत मतदान करून आपल्या हाती सत्ता द्यावे असे आवाहन केले आहे. मतमोजणी दुसऱ्या दिवशी म्हणजे सोमवार दिनांक 15 मे रोजी सिंधुनगरी येथे होणार आहे.