कणकवली l प्रतिनिधी : कणकवली कॉलेज कणकवली कनिष्ठ महाविद्यालय + 2 स्तर राष्ट्रीय सेवा योजना विभाग व यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक अभ्यासक्रम कणकवली कॉलेज कणकवली यांच्या संयुक्त विद्यमानाने दत्तक गाव हरकुळ बुद्रुक ल.गो.सामंत. विद्यालय येथे शुक्रवार दिनांक 20 डिसेंबर 2024 ते गुरुवार दिनांक 26 डिसेंबर 2024 रोजी युवकांच्या सहभागाने आणि पुढाकाराने जलसंवर्धन या संकल्पनेवर आधारित निवासी श्रमसंस्कार शिबिर आयोजित केले
या शिबिराचा समारोप गुरुवार दिनांक 26 डिसेंबर 2024 रोजी ल.गो. सामंत .विद्यालय हरकुळ बुद्रुक येथे संपन्न झाला. याप्रसंगी शिक्षण प्रसारक मंडळाचे विश्वस्त अनिलपंत डेगवेकर ,कणकवली कॉलेज कणकवली चे प्राचार्य युवराज महालिंगे, पर्यवेक्षक. प्रा. एम.के. माने.उपसरपंच आयुब पटेल ल .गो.सामंत विद्यालयाचे मुख्याध्यापक सतीश नेवाळकर ,जिल्हा समन्वयक प्रा विजय सावंत, कार्यक्रम अधिकारी प्रा मनोज कुमार कांबळे ,सहाय्यक कार्यक्रम अधिकारी श्वेता वाळके, प्रा मीना महाडेश्वर, श्री वैभव राणे. आदी उपस्थित होते.
या शिबिराच्या समारोप प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष मा अनिलपंत डेगवेकर शिक्षण प्रसारक मंडळ कणकवली विश्वस्त यांनी आपल्या अध्यक्षीय मनोगतात युवकांच्या सहभागाने आणि पुढाकाराने जलसंवर्धन व जलसाक्षरता ,ग्रामीण पुनर्रचना ,अंधश्रद्धा निर्मूलन ,लेख वाचवा, आदी विचार व्यक्त केले .तसेच कणकवली कॉलेज कणकवली चे प्राचार्य .युवराज महालिंगे यांनी स्वयंसेवकांनी सुसंस्कृत संस्कारशील बनले पाहिजे तुम्ही सर्व नवीन भारतासाठी नवीन शक्ती आहात व स्वच्छतेचे महत्त्व स्पष्ट केले. पर्यवेक्षक प्रा एम के माने यांनी हरकुळ गावातील श्रमसंस्कार शिबिरातून झालेले कार्य कौतुकास्पद आहे असे विचार व्यक्त केले .आणि ल. गो.सामंत विद्यालयाचे मुख्याध्यापक सतीश नेवाळकर यांनी विद्यार्थ्यांनी सुसंस्कृत रहावे भारतीय संस्कृती महाराष्ट्राची लोकधारा जपली पाहिजे असे व्यक्त केले .
या शिबिरात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या स्वयंसेवकांचाही गौरव करण्यात आला आदर्श स्वयंसेवक राहुल मराठे .आदर्श स्वयंसेविका प्रीती गोसावी शिबिरातील उत्कृष्ट काम प्रेरणा जाधव रोशनी ठुकरुल ओमकार ठाकूर रितेश कदम रोशनी परब दिव्या देसाई प्रतीक्षा चव्हाण इत्यादींचा सन्मान करण्यात आला
या श्रमसंस्कार शिबिराचा अहवाल प्रा मनोज कुमार कांबळे प्रमुख पाहुण्यांचे स्वागत प्रा विजय सावंत यांनी केले या कार्यक्रमाचे प्रास्ताविक स्वयंसेविका शुभांगी पाताडे तसेच सूत्रसंचालन स्वयंसेवक मयुरेश पाटील ,श्रेया लाड यांनी केले .तर आभार स्वयंसेविका प्रेरणा जाधव हिने केले.
या कार्यक्रमासाठी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष. दत्तात्रय तवटे. शिक्षण प्रसारक मंडळाच्या चेअरमन डॉ .सौ .राजश्री साळुंखे. शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव विजयकुमार वळंजू. यांचेही मार्गदर्शन लाभले…