कुसूर पिंपळवाडी येथे साईबाबा मंदिर जीर्णोद्धार सोहळा उत्साहात संपन्न

Saibaba temple restoration ceremony at Kusur Pimpalwadi concluded with enthusiasm

आमदार नितेश राणे यांनी उपस्थित राहून साईबाबांचे घेतले दर्शन.

वैभववाडी | प्रतिनिधी :कुसुर पिंपळवाडी येथील  ओम साई बाबा मंदिर जीर्णोद्धार व उद्घाटन सोहळ्याला आमदार नितेश राणे यांनी उपस्थित राहून साईबाबांचे दर्शन घेतले. यावेळी माजी सभापती अरविंद रावराणे, नगराध्यक्षा नेहा माईंणकर, उपनगराध्यक्ष संजय सावंत, नगरसेवक प्रदीप रावराणे, सरपंच शिल्पा साळुंखे, प्राची तावडे, पुंडलिक साळुंखे, श्रीकांत नेवरेकर, चंद्रकांत कुळये, समाधान साळुंखे, एकनाथ कुळये, व ओम साई कुळये मित्रमंडळाचे पदाधिकारी, भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. मंडळाच्या वतीने आमदार नितेश राणे यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.