वैभववाडी | प्रतिनिधी : कुसुर गवळवाडी येथील दत्त मंदिर जीर्णोद्धार सोहळ्याला आमदार नितेश राणे यांनी उपस्थित राहून दर्शन घेतले. यावेळी माजी सभापती अरविंद रावराणे, नगराध्यक्षा नेहा माईंणकर, उपनगराध्यक्ष संजय सावंत, नगरसेवक प्रदीप रावराणे, सरपंच शिल्पा साळुंखे, प्राची तावडे, पुंडलिक साळुंखे, श्रीकांत नेवरेकर, बाळा मुगदार, धनंजय दळवी, प्रदीप मुगदार, समाधान साळुंखे, व मंडळाचे पदाधिकारी, भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. मंडळाच्या वतीने आमदार नितेश राणे यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.