गुहागर | प्रतिनिधी
आयपीएलच्या धर्तीवर खेळवल्या जात असलेल्या तळवली प्रीमिअर लीग पर्व 4 चा थरार उद्या शनिवार दि . 4 व रविवार दि.5 रोजी तळवली चिंचवाडी येथील मैदानावर रंगणार आहे.
सदर स्पर्धेत एकूण 10 संघ सहभागी होणार आहेत.स्पर्धेतील विजेत्या संघास रोख रक्कम 13 हजार आणि आकर्षक चषक तर उपविजेता संघास रोख रु.10 हजार व आकर्षक चषक देऊन गौरविण्यात येण्यात आहे.तर अन्य पारितोषिके देखील देण्यात येणार आहेत.सदरची स्पर्धा ही युट्यूब लाईव्ह असणार आहे.सदर स्पर्धेचा क्रिकेटरसिकानी लाभ घ्यावा असे आवाहन तळवली प्रीमिअर लीग कमिटीच्यावतीने करण्यात आले आहे.