राष्ट्रीय महामार्ग क्र.६६ वरील हातखंबा ते निवळी कोकजेवठार रस्त्याची तातडीने डागडुजी करावी,अन्यथा आक्रमक पवित्रा घेतला जाईल

Hatkhamba to Nivli Kokjevathar road on National Highway No. 66 should be repaired immediately, otherwise aggressive action will be taken.

 रत्नागिरी तालुका उपाध्यक्ष संजय निवळकर यांचे हन इन्फ्रा सोल्यूसन प्रायव्हेट लि. कंपनीच्या व्यवस्थापकांना पत्र*

राष्ट्रीय महामार्ग क्र.६६ वरील हातखंबा ते निवळी कोकजेवठार क्षेत्रामध्ये हन इन्फ्रा सोल्यूसन प्रायव्हेट लि. कंपनी मार्फत महामार्गाचे काम सुरू असून काही ठिकाणी महामार्गावर मोठ्या प्रमाणात खड्डे निर्माण झालेले आहेत.प्रत्येक दिवशी किमान २ अपघात होत असून या क्षेत्रातील डांबरीकरण येत्या ५ दिवसांमध्ये पूर्ण करावे.अन्यथा कोणत्याही प्रवाशाला प्राण गमवावा लागल्यास त्याला पूर्णतः जबाबदार कंपनी असेल त्यांच्याविरोधात खटला चालविला जाईल.असा इशारा रत्नागिरी तालुका उपाध्यक्ष संजय निवळकर यांनी दिला असून अशा आशयाचे पत्र त्यांनी हन इन्फ्रा सोल्यूसन प्रायव्हेट लि.कंपनीच्या व्यवस्थापकांना दिले आहे.