The village library will be inaugurated on Sunday at Machal, a place of cold weather
लांजा (प्रतिनिधी ) तालुक्यातील थंड हवेचे ठिकाण म्हणून प्रसिद्ध असलेल्या माचाळ गावात ‘राजापूर -लांजा तालुका नागरिक संघ मुंबई या संस्थेच्या वतीने ‘ ग्राम वाचनालय ‘ सुरू करण्यात येत असून उद्घाटन कार्यक्रम रविवार दि.१४ मे रोजी सकाळी १० वा. पांडुरंग पाटील यांच्या निवासस्थानी पार पडणार आहे.
सदर वाचनालयाच्या ग्रंथपालपदी माचाळ मधील दिव्यांग असलेल्या कु.रूपाली मांडवकर हिची नेमणूक करून स्थानिकांना रोजगार उपलब्ध करून देण्याच्या संघाच्या संकल्पाचा शुभारंभ करण्यात आहे.
या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान समाजसेविका श्रीमती श्रद्धा कळंबटे भुषविणार असून ज्येष्ठ पत्रकार राजेंद्रप्रसाद मसुरकर,माजी तहसिलदार जयवंत शेट्ये,
लोकमान्य वाचनालय ,लांजाचे अध्यक्ष ॲड.अभिजीत जेधे, मुख्याध्यापक शरद आठल्ये हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.
कार्यक्रमाच्या पूर्वतयारीसाठी दीपक नागवेकर,महेंद्र साळवी,विजय हटकर,मंगेश चव्हाण , शहानवाझ सारंग व अशोक पाटील हे मेहनत घेत असून संघाचे सरचिटणीस प्रमोद पवार पदाधिकारी गणेश चव्हाण,रमेश काटकर व सुरेश पेडणेकर मुंबईहून येणार आहेत.माचाळ गावच्या विकासासाठी व स्थानिकांना रोजगार मिळवून देण्याच्या कामी संघ सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याचे संघाचे अध्यक्ष सुभाष लाड यांनी सागितले.