Sanjay Raut is looking at how to end Uddhav Thackeray
आमदार नितेश राणेंचा संजय राऊतांवर प्रहार
कणकवली : ज्या व्यक्तीने कधी सरपंच पदाची ही साधी निवडणूक लढवली नाही ते संजय राजाराम राऊत कर्नाटक निवडणूक निकालावर भाष्य करत आहेत. हा प्रकार हास्यास्पद आहे. असल्याचे आमदार नितेश राणे यांनी पत्रकार परिषदेत बोलताना सांगितले.
यावेळी ते कणकवली येथील प्रहार भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. दरम्यान संजय राऊत यांच्या आरोपांना त्यांनी त्याच भाषेत प्रत्युत्तर देखील दिले आहे.
ज्यांना निवडणूक म्हणजे काय हे समजते, राजकारण म्हणजे काय हे समजते ते या बावळट संजय राऊत सारख लगेच बोलणार नाहीत. लोकप्रभात असताना संजय राऊत यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या बद्दल जेवढे काही घाणेरड बोलायचे, बाळासाहेबांविषयी कौटुंबिक प्रश्न विचारणारा हाच कारटा संजय राजाराम राऊत, आणि त्याचा मालक अद्यापही याच दुकान बंद करण्याच पाहत नाही. महाराष्ट्र एकीकरण समितीच्या प्रचारासाठी स्नाजय राऊत गेलेला तिथे काय झालं ? ते सांगा. काँग्रेसच्या उमेदवारांमुळे महाराष्ट्र एकीकरण समितीचे उमेदवार पिछाडीवर असल्याचे देखील आमदार नितेश राणे यांनी सांगितले.
पुढे बोलताना आमदार नितेश राणे म्हणाले, राहुल गांधींबरोबर तुमचे चांगले संबंध होते ना मग त्यांना सांगायचं होत की महाराष्ट्र एकीकरण समितीच्या उमेदवारांच्या विरोधात उमेदवार देऊ नका. राहुल गांधी, सोनिया गांधी तुमची काय किंमत करतात ते एकदा नाना पटोलेंकडून ऐकून घ्या. कोर्टाने स्पष्ट सांगितलंय की अपात्रतेचा निर्णय अध्यक्ष घेणार. मग हेच महाशय त्यांच्यावरच टीका करतात. अध्यक्षांना चिडवायच, जेणेकरून उद्धव ठाकरेंना अजून कसा संपवू शकतो हे संजय राऊत पाहत आहे.
समीर वानखेडेनवर सीबीआयची धाड पडली त्यावर बोलताना आ. राणे म्हणाले की, असेच भ्रष्ट अधिकारी संजय राऊत, उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांना लागतात. समीर वानखेडेनी चुकीचं काय केलं असेल तर कारवाई होणारच असेही आमदार नितेश राणे यांनी पत्रकार परिषदेत बोलताना सांगितले. तसेच संजय राऊत यांना तुमचा मालक मुख्यमंत्री असताना सचिन वाझेला परत सेवेत रुजू करून का घेतलं होतं? वाझेना कितीच टार्गेट दिलं होतं ? सचिन वाझे आठवड्यातून पाच दिवस वर्षा बंगल्यावर राहायचा. दिशा सालीयनच्या घरी जी मर्सिडीज पाठवली गेली ती सचिन वाझेचीच होती. त्या रात्री आदित्य ठाकरेंचा सचिन वाझेला किती फोन गेले याचे उत्तर संजय राऊत आणि उद्धव ठाकरेंनी द्यावे, असाही सवाल आ. नितेश राणे यांनी केला आहे.
सचिन वाझे आणि वरून सरदेसाई यांच्यात काय संवाद व्हायचा याचे उत्तर संजय राऊत यांनी द्यायला हवं होते. तुमचा मालक मुख्यमंत्री असताना घेतलेले सर्व निर्णय योग्य होते का ? असा प्रश्नही आ. नितेश राणे यांनी संजय राऊत यांना केला आहे. तसेच सचिन वाझे सर्वांना सांगायचे की मी उद्धव ठाकरेंचा तिसरा मुलगा आहे. मी वर्षा बंगल्यावर असतो. मग याचे उत्तर संजय राऊत, उद्धव ठाकरे देतील का? असंही आ.नितेश राणे म्हणाले.
निवडणूक निककलावर बोलताना पुढे आ. नितेश राणे म्हणाले की, बजरंगबलीचा आशीर्वाद भाजपला मिळेल. कर्नाटक निकालावर एवढ्या लवकर फटाके फोडण्याची गरज नाही. काँग्रेलसला स्वतःच्या आमदारांवर विश्वास नाही, म्हणून त्यांना पळवापळवी करावी लागतेय. काँग्रेसचा इतिहास हा नेहमी अन्याय करणारा पक्ष आहे. काँग्रेस कधीही एकसंघ राहू शकत नाही. राहुल गांधींवर कोणाला विश्वास नाही. काँग्रेस मध्ये मास लीडरला महत्व नाही म्हणून काँग्रेस मध्ये फाटाफूट होते. त्याच प्रमाणे जिथे – जिथे राहुल गांधींनी भारत जोडो यात्रा काढल्या तिथे – तिथे काँग्रेसला अपयश आलेलं दिसत आहे, असंही आमदार नितेश राणे पत्रकार परिषदेत बोलताना म्हणाले.