माडबनच्या भगवती देवीची यात्रा १३ जानेवारी रोजी

राजापूर (वार्ताहर): राजापूर तालुक्यातील माडबन गावचे जागृत देवस्थान श्री भगवती देवी चा वार्षिक यात्रोउत्सव दिनांक १३ जानेवारी रोजी विविध धार्मिक विधिनी संपन्न होणार आहे.

 

यावेळी सकाळी ८ वा श्री देवीची पूजा मंत्र घोष सकाळी ८ वा ३० मी गाऱ्हाणे व दर्शन दुपारी १ वा ते ३ वा महाप्रसाद संध्याकाळी ७ वा ते ९ वा भजन रात्री ९ वा ३० मी ला श्री देव बांदे शोर देव हे भगवती देवीच्या भेटीला येणार आहेत. रात्री १० वा ३० मी ला आभार प्रदर्शन आणि रात्री १२ वा देवीचा गोंधळ चा कार्यक्रम होणार आहे. तरी या उत्सवाचा सर्वांनी लाभ घ्यावा असे आवाहन देवालय समितीने केले आहे.
फोटो श्री भगवती देवी माडबन