मनोरुग्णालयात पडून डोक्याला गंभीर दुखापत झालेल्या महिला रुग्णाचा कोल्हापूर येथे मृत्यू

रत्नागिरी ः प्रतिनिधी : येथील मनोरुग्णालयात पडून डोक्याला गंभिर दुखापत झालेल्या महिला रुग्णाचा उपचारांदरम्यान कोल्हापूर येथील सीपीआर रुग्णालयात मृत्यू झाला.

सीमा प्रविण बाचल (44,मुळ रा.शिरगाव, ता. कराड जि. सातारा) असे उपचारांदरम्यान मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे. ती मनोरुग्ण असल्याने तिच्यावर रत्नागिरी येथील मनोरुग्णालयात उपचार सुरु होते. उपचार सुरु असताना ती हॉस्पिटलमध्येच पडल्याने तिच्या डोक्याला मार लागून गंभिर दुखापत झाली होती. तिला उपचारांसाठी जिल्हा शासकिय रुग्णालयात दाखल करुन अधिक उपचारांसाठी कोल्हापूर येथील सीपीआर रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्याठिकाणी उपचारांदरम्यान 1 जानेवारी 2025 रोजी तिचा मृत्यू झाला. याप्रकरणी रत्नागिरी शहर पोलिस ठाण्यात 11 जानेवारी रोजी आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.