जानवळे प्रिमियर लिग

(पर्व सातवे) क्रिकेट स्पर्धेच्या महासंग्रामला शानदार सुरुवात…

शोध हरवलेल्या गावाचा… आणि भावाचा…

क्रिकेट स्पर्धेमध्ये १२० खेळाडूंचा सहभाग

मोडकाआगर | वार्ताहर : गुहागर तालुक्यातील सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, क्रीडा व आरोग्य असे विविध उपक्रम राबवणाऱ्या जानवळे प्रिमियर लिग (पर्व सातवे) क्रिकेट स्पर्धेच्या महासंग्रामला जानवळे-बौध्दवाडी क्रिकेट मैदान येथे शानदार सुरुवात झाली असून ..शोध हरवलेल्या गावाचा… आणि भावाचा… हे ब्रीदवाक्य घेऊन स्पर्धा संपन्न होणार आहेत. जानवळे प्रिमियर क्रिकेट स्पर्धेचे उ‌द्घाटन गावच्या सरपंच जान्हवी विखारे, ग्रामपंचायत सदस्य मंगेश कोंडविलकर, प्रसन्न पाटील, मुबिन ठाकुर, अर्जुन शितप,जानवळे ग्राम विकास मंडळाचे माजी अध्यक्ष भरत शितप, रमेश नर्बेकर, कोकण विकास मंडळ अध्यक्ष अजय खाडे, माजी सैनिक सुनील जाधव, पत्रकार गणेश किर्वे, सुदेश जाधव, संतोष शितप, अरूण जाधव, संतोष म्हैसकर,मंगेश शितप, शुभाष लांजेकर,जानवळे प्रिमियर लीगचे अध्यक्ष भरत शितप, उपाध्यक्ष सुनील जाधव, सचिव प्रवीण जाधव, अंतिम संसार, ओकार संसारे, प्रितेश रहाटे, यांच्या सह सर्व सदस्य उपस्थित होते.

 

या स्पर्धेमध्ये आठ संघ व १२० खेळाडू यांचा सहभाग होता.या स्पर्धेमध्ये गावदेवी इलेव्हन (तेजस कोंडविलकर), शिव कमलेश्वर कृपा (अक्षय म्हादलेकर व सिद्धेश म्हादलेकर), खेमेश्वर कृपा (एकनाथ जांभळे,सुशांत कोळंबेकर), हयात नाईट रायडर्स (जुनेद घारे, सैफुला बरमारे), समता क्रिकेट (सागर जाधव व माजी सैनिक सुनील जाधव), श्रीवास पॅंथर (संदीप कुंडविलकर व महेंद्र महाडिक), श्री गणेश कृपा (ओमकार संसारे,मुसाफ, ठाकूर), श्री वाघजाई इलेव्हन (भरत शितप व अमोल शितप) आदी संघ सहभागी झाले आहेत.
या स्पर्धेदरम्यान दहावी बारावी व पदवीधर गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला आहे तसेच गावातील विविध क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या मान्यवरांचा जानवळे प्रीमिअर लीगच्या वतीने गौरव करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अंतिम संसारे यांनी केले.स्पर्धेचे समालोचन सिद्धीक मेमन, जहीर शेख यांनी केले.या स्पर्धेसाठी जानवळे प्रिमियर लिगच्या सर्व पदाधिकारी व ग्रामस्थ यांनी सहकार्य केले.