मंडणगड | प्रतिनिधी : तालुक्यातील वेळास बलदेवाडी (नारायण नगर) येथे माजी खासदार अनंत गिते यांच्या खासदार फंडातून मंजूर होवून काम पुर्ण झालेल्या समाज मंदीराचा लोकार्पण सोहळा 12 मे 2023 रोजी मान्यवर ग्रामस्थांच्या उपस्थितीत संपन्न झाला. समाज मंदीर लोकार्पण सोहळ्यास माजी खासदार अनंत गिते, माजी आमदार संजय कदम यांची प्रमुख उपस्थितीती लाभली यावेळी उपस्थित प्रमुख मान्यवरांचा ग्रामस्थांच्या वतीने शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देवून सन्मानित करण्यात आला. या कार्यक्रमास शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे मंडणगड तालुकाप्रमुख संतोष गोवळे, उपतालुकाप्रमुख रघुनाथ पोस्टुरे, समन्वयक धनंजय करमरकर, उप शहरप्रमुख दिपक घोसाळकर, उद्योजक जितेंद्र दंवडे, उद्योजक हेमंत नटे तसेच सर्व पदाधिकाऱ्यांसह ग्रामस्थ कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.