शिक्षक पतपेढी निवडणुकीत दु. २:३० वा. पर्यंत 88.88 टक्के मतदान. 2647 मतदारांनी हक्क बजावला

सिंधुनगरी | प्रतिनिधी : सिंदूर जिल्हा प्राथमिक शिक्षक पतपेढीची निवडणूक आज सुरू असून शिक्षक मतदारांना सायंकाळी चार वाजेपर्यंत मतदानाचा हक्क बजावता येणार आहे. ही निवडणूक चुरशीची ठरत असून दु. ०२.३० वाजेपर्यंत 88.88 टक्के मतदान झाले. 2978 मतदारांपैकी 2647 शिक्षक मतदाराने आतापर्यंत मतदानाचा हक्क बजावला.
कुडाळ ५३१ पैकी ४३०, मालवण ३८५ पैकी ३५५
देवगड ३५० पैकी ३२२,दोडामार्ग १८८ पैकी १७४
सावंतवाडी ५०४ पैकी ४३७,कणकवली ५३८ पैकी ४६५, वेंगुर्ला २७२ पैकी २५०,वैभववाडी २१० पैकी २०४ एवढ्या शिक्षक मतदारांनी दुपारी २-३० वाजेपर्यंत मतदानाचा हक्क बजावला होता. यावेळी फक्त 331 शिक्षक सभासदानी अजून मतदान केले नव्हते. सायंकाळी चार वाजेपर्यंत मतदानाची वेळ असून या पदासाठी विक्रमी मतदान होईल असा अंदाज आहे.
शिक्षक संघटनाने ही निवडणूक प्रतिष्ठेची केली असून भाग्यलक्ष्मी पॅनल व परिवर्तन सहकार पॅनेल अशी एकाच एक लढत असून 15 संचालकांचे भवितव्य मतदान पेटीत सीलबद्ध होत आहे. उद्या सोमवारी सिंधुनगरी येथे प्राथमिक शिक्षक पतपेढी इमारती मतमोजणी होणार आहे.