पिक्चर अभि बाकी है….| कर्नाटक निवडणुकीच्या निकालानंतर आ. नितेश राणेंचे विरोधकांना प्रत्युत्तर

संजय राऊत तीन महिन्यात जेलमध्ये जाणार.?

कणकवली : काल झालेल्या कर्नाटक निवडणूक निकालानंतर भाजपाच्या सगळ्या नेत्यांनी मोठ्या मनाने आपला निकाल स्वीकारला. असल्याचे आमदार नितेश राणे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले आहे. यावेळी ते कणकवली येथील ओम गणेश बंगल्यावर आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते.

पुढे बोलताना आ. नितेश राणे म्हणाले, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील काँग्रेसच्या विजयानंतर काँग्रेसचे अभिनंदन केले. पण जसे आमचे नेते वागले तस भाजपचा विजय झाला असता तर विरोधकांनी काय केले असते.? असा सवालही आ. नितेश राणे यांनी उपस्थित केला आहे.

पुढे बोलताना ते म्हणाले, जर कर्नाटक मध्ये भाजपची सत्ता आली असती तर विरोधकांनी लोकशाही धोक्यात आहे.? व ईव्हीएम चा विषय काढला असता. मात्र त्याच मुद्द्यावर बोलताना आमदार नितेश राणे यांनी विरोधकांवर सडकून टोला लगावलाय. ते म्हणाले, जेव्हा भारतीय जनता पक्षाचा विजय होतो तेव्हा लोकशाही आणि ईव्हीएम मशीन मध्ये बिघाड असतो. मात्र जेव्हा विरोधक जिंकतात तेव्हा लोकशाही आणि ईव्हीएम मशीन यामध्ये बिघाड नसतो का.? हा तर विरोधकांचा दुटप्पीपणा आहे.

कर्नाटक मध्ये काँग्रेस जिंकले की पाकिस्तान कळले नाही – आ. नितेश राणे

कर्नाटक मधील निवडणूक विजयानंतर कर्नाटक मध्ये नक्की काँग्रेस जिंकले की पाकिस्तान हे कळले नाही .? असा सवाल आमदार नितेशान यांनी पत्रकार परिषदेत उपस्थित केला. कर्नाटकातील काँग्रेसच्या विजयाच्या जल्लोषानंतर कर्नाटकात पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा झाल्या. मग नक्की याला काय म्हणायचे.? राहुल गांधी आणि पाकिस्तानची व बिलावलची भाषा एकच आहे. सत्ता मिळवणं हे भाजपचे ध्येय नाही. तर सत्तेच्या माध्यमातून देशाचा विकास करणे हा हेतू आहे.

पाकिस्तानचे झेंडे फडकवणे ह्याला उद्धव ठाकरेच हिंदुत्व म्हणायचं का.?

देशात निवडणुकांच्या विजयानंतर पाकिस्तानचे झेंडे फडकवणे याला उद्धव ठाकरे यांचं हिंदुत्व म्हणायचं का..? असा खर्मरीत सवाल आमदार नितेश राणे यांनी उपस्थित केला आहे. मग जर तसं असेल तर उद्धव ठाकरे यांना सांगा मातोश्रीवर पाकिस्तानचा झेंडा फडकवा. मात्र मातोश्रीवर यानंतर दिसणारा पाकिस्तानचा झेंडा हा उद्धव ठाकरे यांच्यामुळे दिसेल, असंही आमदार नितेश राणे पत्रकार परिषदेत म्हणाले. त्यामुळे ह्यांच्यावर देश द्रोहाचा कायदा चालविला पाहिजे. तसेच बिलावलला मातोश्री वर आणण्याचा प्रयत्न संजय राऊत चा आहे. देशाच्या विरोधकांना मातोश्री वर आणून बिर्याणी खायला घातली जात आहे. आमच्या नेत्यांना धमक्या देतायत ?

पुढे बोलताना आ. नितेश राणे म्हणाले, गेले ते दिवस..! जेव्हा केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी शिवसेना सोडली आणि मातोश्री समोर सभा घेतली तेव्हा हेच संजय राजाराम राऊत कुठे लपून बसले होते.? सामनाच्या ऑफिसच्या बाथरूम मध्ये चार तास स्वतःला कोंडून ठेवलेला हाच संजय राऊत आहे. पोलिसांच संरक्षण बाजूला करून ठेवा. लोक तुमच्या तंगड्या तोडतील असंही आ. नितेश राणे यांनी संजय राऊतांना सुनावलं आहे. कायद्याच्या चौकटीनुसार राहुल नार्वेकर निर्णय घेतील. संजय राऊत तुम्हाला जे काय करायचं असेल ते करा. पत्राचाळ प्रकरणात राऊत तीन महिन्यात जेल मध्ये जाणार असलल्याची माहितीही आ. नितेश राणे यांनी दिली आहे. संजय राऊतांमुळे महविकास आघाडीचे सरकार पडले, असा हल्लाबोल देखील आ. नितेश राणे यांनी केला आहे.

पुढे बोलताना ते म्हणाले, नाना पटोले हे तेव्ह सत्य सांगत होते. नाना पटोले राजीनामा देणार हे संजय राऊतला माहीत होते. मग मित्र पक्षाला का नाही कळविले याच उत्तर संजय राऊत यांनी द्यावे. संजय राऊत या महाशयांना मुख्यमंत्री व्हायचं होत, म्हणून त्यांनी सरकार कोसळण्यासाठी प्रयत्न केले. मागच्या महविकास आघाडीच्या बैठकीला देखील संजय राऊत यांना आमंत्रण नव्हते. कोणाकोणाला फोन करून संजय राऊत यांनी मला कुठेही सध्या स्टूल वर बसवा पण मला निमंत्रित करा अशा विनवण्या केल्या होत्या.

तसेच बेळगाव मध्ये संजय राजाराम राऊत यांच्या पक्षाने फक्त एकच उमेदवार उभा केला होता. कृष्णा पुंडलिक पाटील हे त्यांचं नाव होते. त्याना ९७९ मते मिळाली. त्या पेक्षा जास्त मते नोटा ला पडली. त्यामुळे तुमच्या मालकाच्या स्वतः च्या उबाठा पक्षाची लायकी नाही. असा घणाघात आ. नितेश राणे यांनी संजय राऊत आणि उद्धव ठाकरे यांच्यावर केला आहे. त्यामुळे संजय राऊत यांनी दुसऱ्यांच्या मुलांचलचे बारसे करत बसून स्वतः नपुंसक बनला आहे. असा टोलाही आ. नितेश राणे यांनी लगावला आहे.

कर्नाटक मध्ये केवळ २ आमदार होते. आता आम्ही प्रमुख पक्ष म्हणून निवडणूक लढवली. पण पुढे तुमचं काय.? जे आहेत ते तरी सोबत राहतील की नाही हे माहीत नाही. पुढील काही दिवसांत उद्धव ठाकरे आणि त्याचा मुलगां हे दोघेच असणार त्या पक्षात असंही आ. नितेश राणेंनी पत्रकार परिषदेत टोला लगावला आहे. जर ह्या पुढे आमच्या नेत्याना धमक्या दिल्या. तर तुम्ही खरोखरच जर राजाराम राऊत यांचा मुलगा असाल तर संरक्षण बाजूला करा आम्ही पण संरक्षण बाजूला करतो आणि एकदाच धडा शिकवू. संजय राजाराम राऊत हा राजकारणातील मोठा दलाल.! हा तेवढाच महत्वाचा इतिहास आहे. २०१९ ला मुख्यमंत्री बनायला भेटल नाही याचा राग संजय राऊत उद्धव ठाकरेंवर काढत आहे.

कर्नाटक मध्ये खेळ संपला नाही पिक्चर अभि बाकी है – नितेश राणे यांचे सूचक वक्तव्य

दुसऱ्याच्या लग्नात पुढे – पुढे राहणारे हे संजय राऊत आणि उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे आहेत. स्वतः वांझोटे आहेत त्यामुळे हे इतरांचे बारसे करतात. महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा दलाल व निर्लज्ज माणूस म्हणून संजय राऊत यांची ओळख आहे. राज्यपालांवरील टीकेला देखील आमदार नितेश राणे यांनी प्रत्युत्तर दिले आहे.

पुढे बोलताना ते म्हणाले संजय राऊत ने काँग्रेसच्या उमेदवाराच्या प्रचाराला संजय राऊत गेले होते. तेव्हा तिथेही त्या उमेदवाराकडून पैसे घेतले त्यांचा दलाल म्हणून संजय राऊत तिथे गेला होता.

संजय राऊत तीन महिन्यात अटक झाला तर मी दहा लाख देतो – सांगली प्रकारावरून टीका

ऑन महानाट्य – मला मान्य नाही. पण आमचे पोलिस बांधव हे छत्रपतींच्या विचारांवर चालणारे आहेत. अमोल कोल्हे यांनी खोटी माहिती पसरवणे बंद करावे. गुपचूप शो करा. अमोल कोल्हे यांनी विचार करून भूमिका घ्यावी. असंही आमदार नितेश राणे यांनी ठणकावले आहे. शिवराय आणि शंभू राजेंना बदनाम करण्याचे काम बंद करा. लोकशाही आहे म्हणून तुम्ही निवडणुका जिंकता आम्ही पराभव स्वीकारला आहे. लोकशाही संपवन म्हणजे काय हे इंदिरा गांधींच्या वेळी आणीबाणी झाली ते बघा, तेव्हा कदाचित नाना पटोले भारतीय जनता पक्षामध्ये असतील. काँग्रेसमध्ये नसतील. तेव्हा ते भारतीय जनता पक्षामध्येच होत, म्हणून कदाचित काँग्रेसचा इतिहास व्यवस्थित नाना पटोले याना माहीत नसल्यामुळे ना आणीबाणी आणि लोकशाहीचा खून कशाला म्हणतात..? हे कदाचित नाना पटोले यांना आठवत नसेल. पण संजय राऊत तीन महिन्यात अटक झाले तर मी स्वतः दहा लाख देतो असंही आ. नितेश राणे पत्रकार परिषदेत म्हणाले.