विद्यादीप इग्लिश स्कूल शाळेचा शैक्षणिक दर्जा कौतुकास्पद- तहसिलदार सौ प्रियांका ढोले

लांजा (प्रतिनिधी) विद्यादीप इंग्लिश स्कूल लांजा या शाळेचा शैक्षणिक दर्जा उत्तम असून शाळेची वाढती प्रगती आणि शैक्षणिक दर्जा आणि टिकवून ठेवलेली गुणवत्ता याचे कौतुक करावं तेवढं थोडेच आहे, असे गौरवोद्गार लांजा तहसीलदार सौ.प्रियांका ढोले यांनी विद्यार्थी गुणगौरव समारंभ प्रसंगी केले.

विद्यादीप इंग्लिश स्कूल ॲंड ज्युनिअर कॉलेज आणि देवांग नर्सिंग स्कूल लांजा वतीने विद्यार्थी गुणगौरव आणि वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्रम नुकताच पार पडला. यावेळी प्रमुख पाहुण्या म्हणून तहसिलदार प्रियांका ढोले या बोलत होत्या . यावेळी व्यासपीठावर तहसीलदार सौ.प्रीयांका ढोले यांच्यासह ग्रथंपाल मा.स.अध्यक्ष विधान भवन मुबंई बा.बा.वाघमारे, गट शिक्षणाधिकारी विनोद सांवग, संस्थेचे अध्यक्ष एस.एस.लाखण., संस्थेचे सीईओ अभिषेक लाखण ,माजी नगराध्यक्षा सौ.संपदा वाघधरे, नगरसेविका सौ.दुर्वां भाईशेट्ये, माजी सभापती सौ.दिपाली साळवी, शिवसेना तालुका प्रमुख गुरूप्रसाद देसाई, खरेदी विक्री संघाचे चेअरमन सुभाष लाखण, संचालक राहुल शिंदे, बापू शेट्ये,संजय तोडकरी मुख्याधिपीका सौ.रिध्दी लाखण, सौ.प्रणिता लाखण, मराठी पत्रकार परिषद लांजा शाखेचे अध्यक्ष सिराज नेवरेकर, व्यवस्थापक रमेश लाखण,देवांग नर्सिंग स्कूल प्राचार्य सौ.प्रीयांक खानविलकर, सल्लागार विद्यादीप एज्युकेशन संस्था सौ.मनिषा वाघमारे. प्राचार्य अमोल जाधव विद्यादीप संस्थेचे सेक्रेटरी राजेश पवार, व्यवस्थापक सौ.सध्या पवार आदी उपस्थित होते.
यावेळी उपस्थित मान्यवरांनी मार्गदर्शनपर भाषणे झाली. यानंतर आयोजित कार्यक्रमांमधे विद्यार्थ्यांनी विविध नृत्यअविष्कार करुन उपस्थित सर्वांची वाहवा मिळवली. अध्यक्ष एस.एस.लाखण यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व शिक्षक विद्यार्थी पालक यांनी मेहनत घेतली. आणि मोठ्या उत्साहात थाटामाटात स्नेहसंमेलन नुकतेच संपन्न झाले.