चिपळूण : प्रबुद्ध विचार मंच सावर्डे व श्रमिक कृषी संवर्धन संस्था आरवली संगमेश्वर यांच्या संयुक्त विद्यमानाने महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना संविधान विषयी जागृती आणि सजगता निर्माण होण्यासाठी शुक्रवार दिनांक २४ जानेवारी रोजी सकाळी १० वाजता सह्याद्री शिक्षण संस्थेत कला व विज्ञान महाविद्यालय सावर्डे येथे वकृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. यासाठी नोंदणी पर्यंत करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
संविधानातील समता, स्वातंत्र्य, बंधुता, न्याय या मूल्यांचा प्रचार कसा करून विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व मध्ये ते दिसून यावेत आणि भारतीय संविधानाचा प्रचार व्हावा यासाठी हा प्रयत्न सुरू आहे. या वकृत्व स्पर्धेसाठी ठराविक विषय निवडण्यात आले आहेत. त्यामध्ये भारताचा सर्वोच्च दस्तऐवज : संविधान, भारतीय संविधानासमोरील आव्हाने, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अपेक्षित सामाजिक लोकसभा कुठे आहे? संविधान व लोकशाही खरीच धोक्यात आले आहे का? , संविधानाबाबत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी केलेले भाषण ठरत आहे काय ? असे पाच विषय देण्यात आले आहेत. ही वक्तृत्व स्पर्धा निशुल्क असून महाविद्यालयीन विद्या विद्यार्थ्यांसाठीच स्पर्धेचे आयोजन केलेले आहे. स्पर्धेसाठी महाविद्यालयाचे संमती पत्र आवश्यक आहे. स्पर्धेसाठी मराठी भाषा अनिवार्य आहे. प्रत्येक स्पर्धकाला सादरीकरण साठी पाच अधिक दोन मिनिटांची वेळ दिली जाईल. सर्वात आधी नोंदणी केलेल्या २५ विद्यार्थ्यांना वकृत्व स्पर्धेत सहभाग केले जाईल. परीक्षांचा निकाल अंतिम राहील. या स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावणाऱ्या स्पर्धकाला ३ हजार रुपये व सन्मान चिन्ह प्रशस्तीपत्रक आणि पुस्तक, द्वितीय क्रमांक २ हजार रुपये सन्मान चिन्ह प्रशस्तीपत्रक व पुस्तक, तृतीय क्रमांक १ हजार सन्मानचिन्ह प्रशस्तीपत्र पुस्तक व दोन उत्तेजनार्थ पारितोषिक ५०१ एक प्रमाणे दिली जातील. ही स्पर्धा सह्याद्री शिक्षण संस्थेचे कला व विज्ञान महायुद्ध सावर्डे येथे २४ जानेवारी रोजी सकाळी १० वाजता होणार आहे. नाव नोंदणीसाठी विलास डिके ८८०५७९३०७० व अमरदीप कदम ८६०५६२७८३४ या क्रमांकावर संपर्क साधावा.