रत्नागिरी ः प्रतिनिधी : तालुक्यातील पावस खारवीवाडा येथे गावठी दारुची बेकायदेशिरपणे विक्री करणार्या महिले विरोधात पूर्णगड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.ही कारवाई शनिवार 13 मे रोजी दुपारी 12.10 वा.करण्यात आली. वासंती गणपत पावसकर (रा.पावस,रत्नागिरी) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयित महिलेचे नाव आहे.शनिवारी दुपारी पूर्णगड पोलिस खारवीवाडा येथे गस्त घालत होते.तेव्हा त्यांना ही महिला घराच्या समोर मोकळ्या जागेत 335 रुपयांची 5 लिटर दारु बेकायदेशिरपणे विक्री करत असताना दिसून आली.तिच्याविरोधात महाराष्ट्र दारुबंदी 1949 चे कायदा कलम 65 (ई) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.