रत्नागिरी | प्रतिनिधी : रत्नागिरी जिल्ह्यात, मागील काही दिवसात, काही इसम अमली पदार्थांचे सेवन करत असलेबाबत माहिती प्राप्त झाली होती. या अनुषंगाने, मा. पोलीस अधीक्षक, रत्नागिरी श्री. धनंजय कुलकर्णी तसेच अपर पोलीस अधीक्षक श्रीमती जयश्री गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली व सूचनेप्रमाणे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक, श्री. हेमंतकुमार शहा व पथकामार्फत रत्नागिरी शहारामधील विविध ठिकाणी गस्त घालण्यात येत होती.
दि. 13/05/2023 रोजी २२.०० वा. चे दरम्याने स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेतील पथकाने रत्नागिरी शहर व ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये पेट्रोलिंग करत असताना, ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीमधील पारस नगर, खेडशी तलाठी कार्यालयाच्या पाठीमागील मोकळ्या जागेत एक इसम संशयित हालचाली करत असताना मिळून आला म्हणून त्याची दोन पंचांसमक्ष अंगझडती घेतली असता त्याच्याजवळ अमली पदार्थाचे सेवन करण्याकरिता अमली पदार्थ सदृश्य गांजा ची एक पुडी व इतर साहित्य आपले ताब्यात बाळगले असता मिळून आला म्हणून त्यास स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ताब्यात घेतले.
या संशयीत इसमास स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने नाव-गाव विचारता त्याने आपले नाव अनिल मान बहादूर गुरूंग, वय २३, रा. ग्रामीण पोलीस ठाणे जवळील नवीन बिल्डिंग, कारवांनचीवाडी व मुळ राहणार- पोलमाणपुर बाजारपेठ, जिल्हा कैलाली, नेपाळ असे सांगितले. तसेच त्याच्या अंग झडती मधून 15.72 ग्रॅम गांजा हा अंमली सदृश पदार्थ मिळून आलेला आहे तसेच त्याच्या विरुद्ध रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर नंबर 71/2023 एन.डी.पी.एस. अॅक्ट कलम ८ व २७ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यातील ताब्यात व त्यास मा. न्यायालयात हजर केले असता त्यास १ दिवस पोलीस कोठडी रीमांड देण्यात आलेला आहे.
या गुन्ह्याचा अधिक तपास व पुढील योग्य ती कारवाई रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाणे करीत आहे.
ही कारवाई, स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकातील खालील नमूद पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केली आहे.
1) श्री. हेमंतकुमार शहा, पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा, रत्नागिरी,
2) सपोफौ/65 बोरकर
3) पोहेकाँ/251 झोरे
4) पोहेकाँ/301 पालकर
5) पोहेकॉ/1238 खांबे व
6) पोकॉ/215 कांबळे (चालक).