नासा इस्रो भेटीसाठी वनगुळे शाळा नं.१ च्या मनस्वी गुरव व सुचित तावडे यांची निवड

लांजा (प्रतिनिधी) नासा इस्रो भेटीसाठी तालुक्यातील वनगुळे शाळा नं.१ च्या मनस्वी गुरव व सुचित तावडे या दोन विद्यार्थ्यांची निवड झाली आहे.
रत्नागिरी जिल्हा परिषद शिक्षण विभागा मार्फत विद्यार्थ्यांसाठी वैज्ञानिक दृष्टिकोन रुजावा, विज्ञानाची जाण व्हावी या उद्देशाने इस्रो निवड चाचणीचा उपक्रम घेतला जातो. नुकत्याच लांजा तालुकास्तरीय घेण्यात आलेल्या नासा, इस्रो निवड चाचणी परीक्षेत वनगुळे शाळेने सुयश संपादन केले होते.सदर निवड चाचणीमध्ये वनगुळे शाळा नं.१ च्या कुमारी मनस्वी प्रभाकर गुरव हिने प्रथम क्रमांक तर कुमार सुचित दिलीप तावडे यांनी चौथा क्रमांक मिळवून जिल्हास्तरावर मुलाखतीसाठी त्यांची निवड झाली होती.

 

 

दरम्यान , नासा इस्रो भेट परीक्षेसाठी वनगुळे शाळा नं१ चे विद्यार्थी कु.सुचित दिलीप तावडे याची नासा इस्रोभेटी व मनस्वी प्रभाकर गुरव हिची इस्रो भेटीसाठी निवड झाली आहे. शाळेचे मुख्याध्यापक रविंद्र निवळे यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षक विलास गोरे , बाळू नागरगोजे, दिपक सातपुते यांचे मार्गदर्शन या विद्यार्थ्यांना लाभले.
वनगुळे शाळेने सलग तिसऱ्या वर्षी हे यश मिळवले त्याबद्दल सर्व स्तरातून विद्यार्थी व शिक्षक यांचें अभिनंदन करण्यात येत आहे*