अवघ्या 48 तासात उलगडलेल्या गिम्हवणे येथील खुनाचा घटनाक्रम
दापोली पोलिसांच्या तत्पर तपासाने कोकणाला हादरवणारे खून प्रकरण उघड
दापोली | रुपेश वाईकर
आपला पती बेपत्ता झाल्याची तक्रार दापोली पोलीस स्थानकात दाखल करून आपण जणू काही केलेच नाही असं भासवणाऱ्या पत्नीनेच पतीचा आपल्या प्रियकराच्या साथीने गळा आवळून अत्यंत निर्घृणपद्धतीने खून करून मृतदेह विहिरीत टाकून दिल्याचा धक्कादायक व संतापजनक प्रकार कोकणात दापोली तालुक्यात घडल्याने मोठी खळबळ उडाली आहे. पती बेपत्ता झाल्याची तक्रार देणाऱ्या पत्नीवरच दापोली पोलिसांचा संशय होता त्या दिशेने तपास करून अवघ्या 48 तासातच दापोली पोलिसांना या हत्या प्रकरणाचा छडा लावण्यात मोठे यश आल आहे.
केशकर्तनालयाचा व्यवसाय करणाऱ्या निलेश दत्ताराम बागकर याचा कट रचून खून झाल्याच आता स्पष्ट झाल आहे. याप्रकरणी मृताची पत्नी आणि एसटी चालक प्रियकर मंगेश शांताराम चिंचघरकर या दोघांनाही अटक करण्यात आली आहे.
दापोली शहराजवळ की गिम्हवणे येथे निलेश बागकर व त्याचा भाऊ या दोघांचाही केशकर्तनालयाचा पारंपरिक व्यवसाय आहे. मृत निलेश याचे आणि त्याच्या पत्नीचे काही घरगुती कारणावरून अनेकदा वाद होत होते. आपल्या पत्नीचे बाहेर काही सुरू असल्याचा संशय निलेश व त्याच्या काही नातेवाईकांना होता.
तर आपल्या वाटेत आपल्या पती निलेश अडथळा असल्याचे पत्नीला वाटत होते. म्हणूनच तिने निलेशला संपवण्याचा कट आपल्या प्रियकराच्या मदतीने आठवड्यापूर्वीच रचला होता अशी धक्कादायक माहिती पोलीस तपासात समोर आली आहे.
आपल्या पती बेपत्ता असल्याचा तक्रार देणाऱ्या पत्नीला पोलीस निरीक्षक विवेक अहिरे यांनी चौकशीला बोलावले होते. त्यावेळी या प्रकरणातील संशयित आरोपी पत्नी नेहा ही कामाला जात असलेल्या हॉटेलमधील कामाचे टाइमिंग व तिने पोलिसांना चौकशी सांगितलेले टाइमिंग यामध्ये तफावत आढळली आणि पोलिसांची संशयाची सुई तिच्याकडे वळली. यावेळी तिला पुन्हा एकदा चौकशीला बोलवण्यात आलं होतं. बुधवारी पत्नी हिला पोलीस पथकाने चौकशीसाठी ताब्यात घेतलं चौकशीचा पोलिसी हिसका दाखवताच तिने या खून प्रकरणाची कबुलीच पोलिसांना दिली आहे.
यावेळी कार मध्ये बसलेला निलेश व त्याची पत्नी अशा स्वरूपाचं काही सीसीटीव्ही फुटेजही तपासात पोलिसांच्या हाती आले आहे.
या हत्या प्रकरणातील संशयित आरोपी पत्नी हिने तिचा पालगड येथील एसटी चालक प्रियकर मंगेश चिंचघरकर याच्या मदतीने हा खून केला आहे. मंगेश व निलेश यांचे गेल्या दहा-बारा वर्षांपासून घरगुती संबंध होते त्यामुळे मंगेश याच्याबरोबर कारमधून जाताना निलेशला कोणताही संशय आला नाही . याच सगळ्याचा फायदा घेऊन हा कट रचण्यात आला होता अशी माहिती पोलीस तपासात समोर आली आहे. दोन दिवसांपूर्वी सायंकाळी हर्णै येथे मयत निलेशची पत्नी व मंगेश यानी निलेश याला कारमधून पार्टीसाठी नेले होते. या ठिकाणी मद्य प्राशन केल्यानंतर हर्णै बायपास येथे अत्यंत निर्दयीपणे निलेशाचा गळा होऊन दोघांनी त्याचा खून केला. त्यानंतर पुरावा नष्ट करण्यासाठी पालघर येथे रस्त्याच्या बाजूला असलेल्या एका विहिरीत निलेश चा मृतदेह कमरेला लोखंडी जड वस्तू बांधून टाकून देण्यात आला अशी ही कबुली निलेशच्या पत्नीने पोलीस तपासात दिली आहे. त्यानंतर तात्काळ पोलिसात पथकाने पालघर येथील विहिरीत गळ टाकून हा निलेश याचा मृतदेह बाहेर काढला आहे
यावेळी संशयित मंगेश हा फरार झाला होता. त्याचा शोध दापोली पोलिसांनी काही तासात लावला. तो दापोली एसटी डेपोतून एका बंद गाडीमध्ये बसला होता त्याला बुधवारी मध्यरात्री उशिरा पोलीस पथकाने ताब्यात घेऊन चौकशीनंतर उशिरा अटक केली आहे. दापोली पोलिसांनी दोघांनाही अटक केली आहे. हत्या करणे, हत्येचा कट रचणे,पुरावा नष्ट करून मिळून गुन्हा करणे अशा स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी, अप्पर जिल्हा पोलीस अधीक्षक जयश्री गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली दापोलीचे पोलीस निरीक्षक विवेक अहिरे ,सहाय्यक निरीक्षक प्रवीण देशमुख, पोलीस उपनिरीक्षक राजकुमार यादव तसेच महिला पोलीस उपनिरीक्षक रूपाली ढोले या पोलीस पथकाने या सगळ्या प्रकरणाचा अवघ्या काही तासात छडा लावला आहे.













