पालकमंत्री झाल्यानंतर मंत्री ना. नितेश राणे पहिल्यांदाच सिंधुदुर्ग दौऱ्यावर आल्यावर जल्लोषी स्वागत
कणकवली : मत्स्योद्योग व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्हयाचे पालकमंत्री ना. नितेश राणे हे आज सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर पहिल्यांदाच आलेले असताना कणकवली येथील श्रीधर नाईक चौकात पुष्पगुच्छा देऊन त्यांचे भव्य स्वागत करण्यात आले.
मत्स्योद्योग व बंदरे विकास मंत्री तथा पालकमंत्री ना. नितेश राणे यांच्या स्वागतासाठी पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती. यावेळी पालकमंत्री नितेश राणे साहेब आगे बढो…. हम तुम्हारे साथ है, अशा जोरदार घोषणा देखील यावेळी देण्यात आल्या.
यावेळी कणकवलीचे माजी नगराध्यक्ष समीर नलावडे, माजी उपनगराध्यक्ष बंडू हर्णे, माजी गटनेते संजय कामतेकर, माजी नगरसेविका मेघा गांगण, माजी सभापती सुरेश सावंत, माजी नगरसेवक अभिजीत मुसळे, बंडू गांगण, विराज भोसले, राजु गवाणकर, माजी उपनगराध्यक्ष किशोर राणे, चारुदत्त साटम, रवींद्र गायकवाड, राजु पेडणेकर, भाजपा तालुकाध्यक्ष मिलिंद मेस्त्री, राजू हीर्लेकर, समीर प्रभूगावकर, स्वप्नील चिंदरकर, प्रशांत राणे, सर्वेश दळवी, नयन दळवी, मंदार सोगम, भाई आंबेलकर, भाजपा शहराध्यक्ष अण्णा कोदे, जिल्हा बँक संचालक समीर सावंत, भाजपा शहराध्यक्ष प्राची कर्पे, संजीवनी पवार, संजना सदडेकर, करंजे सरपंच सपना मेस्त्री, साकेडी सरपंच सुरेश साटम, जाणवली सरपंच अजित पवार, सुभाष मालडकर, विजय चिंदरकर, संदीप सावंत, यांच्यासह अन्य पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.