नांदिवडे-घोगलवाडी येथील जंगलमय भागात सुरु असलेल्या हातभट्टीवर पोलिसांची धाड

crime

रत्नागिरी | प्रतिनिधी : तालुक्यातील नांदिवडे-घोगलवाडी येथील जंगलमय भागात बेकायदेशिरपणे गावठी हातभट्टीची दारु विक्री करणार्‍या विरोधात जयगड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.ही कारवाई शनिवार 13 मे रोजी दुपारी 12.30 वा.करण्यात आली.
विनोद सुरेश गुरव (रा.जयगड) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे.शनिवारी दुपारी जयगड पोलिस नांदिवडे येथे गस्त घालत असताना त्यांना घोगलेवाडी येथील जंगलमय परिसरात संशयित हा आपल्या ताब्यात गावठी दारु विक्रीसाठी बाळगून असलेला दिसून आला.पोलिसांनी त्याच्याकडून 775 रुपयांची 15 लिटर गावठी दारु आणि इतर साहित्य जप्त केले.त्याच्याविरोधात महाराष्ट्र दारुबंदी 1949 चे कायदा कलम 65 (ई) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याप्रकरणी अधिक तपास जयगड पोलिस करत आहेत.