बीएसएनएलच्या कंत्राटी कामगारांच्या थकीत वेतनाबाबत मनसे आक्रमक

अधिकाऱ्यांना घेराओ घालत वेधले लक्ष

सावंतवाडी । प्रतिनिधी : बीएसएनएल मध्ये काम करणाऱ्या येथील कंत्राटी कर्मचाऱ्यांचा गेल्या चार वर्षातील वेतन तिघा ठेकेदारांकडून थकीत आहे. याकडे संबंधित कर्मचाऱ्यांनी लक्ष वेधल्यानंतर मनसेच्या पदाधिकारी-कार्यकर्त्यांनी बीएसएनएलच्या अधिकाऱ्यांना घेराव घातला. यावेळी संबंधित ठेकेदारांशी संपर्क साधून वेतन देण्यासंदर्भात तात्काळ कार्यवाही करण्याची मागणी त्यांनी केली. दरम्यान मोबाईल द्वारे ठेकेदारांशी संपर्क साधून झालेल्या चर्चेनंतर येत्या आठ दिवसात पगार देण्याची कार्यवाही सुरू केली जाईल, असे आश्वासन बीएसएनएलच्या जिल्हा प्रबंधकांनी दिले.

यावेळी शहराध्यक्ष आशिष सुभेदार, परिवहन जिल्हाध्यक्ष राजू कासकर, संतोष भैरवकर, सचिव कौस्तुभ नाईक, दर्शन सावंत, संदेश शेटये, आदींसह कर्मचारी संतोष गावडे, तानाजी सावंत, दशरथ कुंभार, हरी परब, संजय बांदेकर, चिंतामणी दळवी, निलेश मालेगावकर, मेहरीन खान, महेश राणे, सुनील हळदणकर, विजय वाडकर उपस्थित होते.

येथील बीएसएनएल सेवेत काम करणाऱ्या काही कंत्राटी कर्मचाऱ्यांचे वेतन ठेकेदारांकडून देण्यात आले नाही. २०१८ पासून ही परिस्थिती उद्भवली आहे. २०२२ पर्यंत तीन ठेकेदार झाले. मात्र प्रत्येक ठेकेदाराकडे कर्मचाऱ्यांचे वेतन थकीत आहे. यातील १५ ते १६ कर्मचाऱ्यांनी मनसेचे याकडे लक्ष वेधले. तसेच आपण या संदर्भात खासदार विनायक राऊत यांना निवेदन दिले होते. त्यांनी पगार मिळवून देण्याचे आश्वासन त्यावेळी आम्हाला दिले होते. मात्र अद्याप कोणतीही कार्यवाही झाली नाही, अशी नाराजी ही त्यांनी व्यक्त केली होती. यावेळी मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी थेट बीएसएनएल कार्यालय गाठत अधिकाऱ्यांना धारेवर धरले. दरम्यान वेतन थकीत ठेवणाऱ्या ठेकेदारांशी संपर्क साधण्याचे मागणी केली. यावेळी बीएसएनएलच्या अधिकाऱ्यांनी ठेकेदारांशी संपर्क साधून चर्चा केली. त्यानंतर येत्या आठ दिवसात थकीत पगार देण्यासंदर्भात कार्यवाही सुरू करू, असे आश्वासनही त्यांनी उपस्थितांना दिले

Sindhudurg

 

 

.