जेष्ठ पत्रकार वसंत केसरकर यांच्या “स्मरण साखळी” पुस्तकाचे प्रकाशन

Google search engine
Google search engine

माजी केंद्रीय मंत्री रमाकांत खलप यांची उपस्थिती

सावंतवाडी । प्रतिनिधी : राजकारणतला प्रवास, महाराष्ट्र एकीकरण समितीच्या माध्यमातून लढण्यात आलेले लढे आणि जीवनातील अनेक चढ उतारांची यशोगाथा सांगणार्‍या सावंतवाडी येथील जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा उर्फ वसंत केसरकर यांच्या “स्मरण साखळी” पुस्तकाचे प्रकाशन मंगळवारी माजी केंद्रीय मंत्री रमाकांत खलप व सावंतवाडी संस्थानचे राजे खेमसावंत भोसले यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले.

यावेळी राजमाता शुभदा देवी, माजी आमदार शंकर कांबळी, माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर, जिल्हाप्रमुख संजय पडते, भाई गोवेकर, सिंधुदुर्ग जिल्हा मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष उमेश तोरसकर, राष्ट्रीय मराठी पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष गजानन नाईक, राजेश मोंडकर, पंढरी परब, प्रवीण मांजरेकर जी.ए बुवा यांच्यासह पत्रकार व सदस्य उपस्थित होते.

Sindhudurg