कोकण रेल्वे मार्गावर आज होणार वंदे भारत’ एक्स्प्रेस ची ट्रायल !

Trial of Vande Bharat Express will be held today on the Konkan railway route!

मार्गावर केली जाणार चाचपणी , खेड ला थांबा मिळण्याची प्रतीक्षा

देवेंद्र जाधव | खेड : कोकण रेल्वे मार्गावर अनेक वेगवान गाड्या धावत असताना आता बहु चर्चित असलेली वंदे भारत एक्स्प्रेस ही गाडी मंगळवारी कोकण मार्गावर धावणार आहे मात्र या गाडी साठी केवळ मार्गाची चाचपणी होणार असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे

वंदे भारत एक्सप्रेस ही भारतीय रेल्वेची एक अर्ध-द्रुतगती रेल्वे सेवा आहे. वंदे भारत एक्सप्रेस, पूर्वी ट्रेन-१८ म्हणून ओळखली जात होती. ही भारतीय रेल्वेद्वारे चालवली जाणारी इलेक्ट्रिक मल्टी-युनिट ट्रेन आहे. सुरक्षेच्या कारणास्तव ट्रेनचा चालवण्याचा वेग बहुतेक मार्गांवर १३० किमी प्रतितास पर्यंत मर्यादित आहे. त्या मुळे कोकण मार्गावर ही गाडी चालवण्यासाठी योग्य आहे का याची चाचपनी मंगळवारी सी एस टी ते मडगाव अशी करण्यात येणार आहे ही एक्स्प्रेस सी एस टी वरून पहाटे ५.३० वाजता सुटून दुसऱ्या दिवशी मडगाव हुन २.३०ला मुंबई ला रवाना होणार आहे मात्र या गाडीला केवळ पनवेल हुन थेट चिपळूण ला थांबा मिळणार असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे त्यामुळे खेड ला थांबा मिळावा ही मागनी होत आहे

दरम्यान मार्च मध्ये रेल्वे राज्य मंत्री राव साहेब दानवे यांच्या दालनात कोकण विकास समिती, जल फाउंडेशन यांची या बाबत बैठक पार पडली होती या बैठकीत को रे मार्गावर धावणाऱ्या अनेक जलद गाड्याना थांबा देण्याची मागणी करण्यात आली होती मात्र या प्रस्तावाला हिरवा कंदील दाखवला गेला नाही त्यात सुरू होणाऱ्या वंदे भारत या गाडीला थांबा मिळावा ही प्रमुख मागणी आहे

या चाचपनी मध्ये रेल्वे मार्ग , मार्गावर असलेले बोगदे , प्लॅटफॉर्म , वेग यांची तपासणी केली जाणार आहे त्यानंतरच ही गाडी सुरू करणार की नाही यावर रेल्वे प्रशासन विचार करणार आहे

जनशताब्दी, मंगला, तेजस, गरीबरथ, लोकमान्य टिळक टर्मिनस कोचुवेली, लोकमान्य टिळक टर्मिनस करमळी, तिरुनेलवेली दादर, मंगळुरू मुंबई, हिसार कोईंबतूर, इंदूर कोचुवेली या गाड्यांचे थांबे मिळण्याच्या मागण्या प्रलंबित असताना नव्याने सुरू होणाऱ्या वंदे भारत एक्सप्रेसलाही खेड येथे थांबा मिळणार नसेल तर तो जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार असेल आणि प्रवाशांकडे उठाव करण्याव्यतिरिक्त दुसरा उपाय नसेल.अशी प्रतिक्रिया रेल्वे अभ्यासक अक्षय म्हाब्दी यांनी ‘प्रहार’ शी बोलताना व्यक्त केली

कोणत्याही एक्सप्रेसला थांबा मागितल्यावर “कोकण रेल्वेवर सर्व स्थानकांना गाड्या वाटून देण्यात येतात” असे उत्तर मिळते. परंतु मुंबईतून रात्री उशिरा किंवा पहाटे लवकर सुटणाऱ्या जनशताब्दी, मंगला, तेजस, लोकमान्य टिळक टर्मिनस करमळी आणि संध्याकाळी मुंबईकडे जाणाऱ्या जनशताब्दी, तेजस, करमळी लोकमान्य टिळक टर्मिनस या गाड्या खेडला थांबत नाहीत. त्यात वंदे भारतही खेडला थांबली नाही तर अर्ध्या ते एक तासात खेडला न थांबणाऱ्या एकूण चार गाड्या होतील. या सर्व गाड्या त्याच त्याच स्थानकांवर थांबत असल्यामुळे इतर स्थानकांतील प्रवाशांनी केवळ धडधडत जाणाऱ्या गाड्या मोजतच बसावे का असा प्रश्न उपस्थित होतो.

त्यामुळे, कोकण रेल्वेने मूळ वेळापत्रकातच सर्व स्थानकांना समान गाड्या वाटपाचे सूत्र लागू करुन योग्य ते थांबे द्यावेत व खेडला न्याय द्यावा अशी मागणी जोर धरत आहे