कळसुली गावात क्रशरसाठीच्या स्फोटकांचा साठा नको…!

Google search engine
Google search engine

ग्रामस्थांचे रात्री ११ वाजता अचानक भयानक आंदोलन…!

प्रशासन यंत्रणेच्या भूमिकेकडे ग्रामस्थांचे लक्ष ; अन्यथा होणार मोठे आंदोलन..!

कणकवली I मयुर ठाकूर : कळसुली गावामध्ये गेली कित्येक वर्ष क्रशर व्यवसाय चालू आहे. आणि क्रशर व्यवसायाला ब्लास्टिंग करण्यासाठी मोठ्या प्रमाणात स्फोटके वापरली जातात. त्या स्फोटकांचा साठा कळसुली पिंपळेश्वर नगर येथे कोणतीही परवानगी न घेता करण्यात आल्याचे ग्रामस्थांनी सांगत आक्रमक भूमिका घेत या साठ्याच्या विरोधात सोमवारी रात्री ११ वाजता रस्त्यावर उतरले होते. त्यामुळे काही वेळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. या क्रशरमध्ये होणाऱ्या स्फोटामुळे कळसुली गावातील बहुसंख्य घरांना तडे गेले आहेत आणि गावामध्ये राहणे मुश्किल झाले आहे. असे कळसुली ग्रामस्थांचे म्हणणे आहे. त्यामुळे आमच्या गावात स्फोटके ठेवायची नाहीत असे या ग्रामस्थांचे म्हणणे आहे.

No stock of explosives for crushers in Kalsuli village…!

यावेळी ग्रामस्थांनी पोलिसांना देखील पाचारण केले होते. यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षणक सागर खंडागळे यांनी घटनास्थळी दाखल होत स्पोटके असणाऱ्या जागे मालकाला बोलवण्यात आले व परवाना आहे की नाही या संदर्भात विचारण्यात आले. त्यावेळी या जागे मालकांनी पोलिसांना आपली कागदपत्रे सादर केली. त्यावेळी ग्रामस्थांनी या परवाना संदर्भात ग्रामपंचायतचा कुठलाच परवाना नसल्याचे सांगत आम्हाला आमच्या गावामध्ये ही स्फोटके ठेवायची नसल्याचे सांगत रात्री अकरा वाजता रस्त्यावर ठाण मांडून बसून राहिले होते. त्यामुळे गावातील वातावरण तणावाचे बनले होते.

यावेळी जयवंत सुलभा गावकर, कळसुली सरपंच सचिन पारधीये, संजय नेरुरकर, अरुण गावकर, समीर गावकर, जयवंत गावकर, नामदेव गावकर, नामदेव वायंगणकर, निलेश गावकर, सुभाष गावकर उपस्थित होते.