महाराष्ट्रातील वाहनांसाठी HSRP नंबर प्लेट बंधनकारक – शासनाचा नवा आदेश
मुंबई, २ फेब्रुवारी २०२५: महाराष्ट्र शासनाच्या परिवहन विभागाने ४ डिसेंबर २०२४ रोजी नवीन प्रमाणित प्रक्रिया (SOP) जाहीर केली आहे. यानुसार, १ एप्रिल २०१९ पूर्वी नोंदणीकृत सर्व वाहनांवर उच्च सुरक्षा नोंदणी प्लेट्स (HSRP) लावणे अनिवार्य करण्यात आले आहे.
HSRP म्हणजे काय?
उच्च सुरक्षा नोंदणी प्लेट्स (HSRP) या टॅम्पर-प्रूफ असून त्यामध्ये अद्वितीय ओळख क्रमांक, लेझर-एच्च केलेला कोड आणि सुरक्षितता वैशिष्ट्ये असतात. यामुळे वाहन चोरी, बनावट नंबर प्लेट्स आणि वाहनांसंबंधित गुन्ह्यांवर नियंत्रण ठेवण्यास मदत होणार आहे.
HSRP लावणे कसे अनिवार्य?
परिवहन विभागाच्या आदेशानुसार, १ एप्रिल २०१९ पूर्वी नोंदणीकृत वाहनांचे मालक त्यांच्या वाहनांवर HSRP बसवण्यास बांधील आहेत. या प्रक्रियेसाठी वाहनमालकांनी www.transport.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर जाऊन HSRP ऑनलाइन बुकिंग लिंकवर क्लिक करावे.
HSRP ऑनलाइन बुकिंग प्रक्रिया:
1. वेबसाइटवर लॉगिन करून वाहनाच्या नोंदणी क्रमांकानुसार संबंधित कार्यालय निवडावे.
2. वाहनाची माहिती आणि Vahan डेटाबेसमध्ये नोंदणीकृत मोबाइल नंबर प्रविष्ट करावा.
3. HSRP फिटमेंट सेंटर निवडून सोयीस्कर तारीख व वेळ निश्चित करावी.
4. HSRP फी ऑनलाइन भरावी आणि निवडलेल्या तारखेला सेंटरवर जाऊन HSRP बसवून घ्यावी.
HSRP विक्रेत्यांची झोननुसार माहिती:
महाराष्ट्रातील वेगवेगळ्या झोनसाठी अधिकृत HSRP विक्रेत्यांची यादी पुढीलप्रमाणे आहे:
झोन-१: (MH47, MH04, MH46…) – Ms Rosmerta Safety Systems Ltd – https://mhhrsp.com
झोन-२: (MH01, MH03, MH48…) – Ms Real Mazon India Ltd – https://hsrpmizone2.in
झोन-३: (MH02, MH43, MH07…) – Ms FTA HSRP Solutions Pvt. Ltd – https://maharashtrahrs.com
नकली नंबर प्लेट्स वापरणाऱ्यांवर कारवाई!
रस्त्यावर नकली HSRP, स्मार्ट नंबर प्लेट्स, बनावट होलोग्राम किंवा “INDIA” शिलालेख असलेल्या प्लेट्स वापरणाऱ्या वाहनांवर कठोर कारवाई करण्यात येणार आहे.
HSRP न लावल्यास दंड किती?
CMVR 1989 च्या नियम ५० आणि मोटर वाहन अधिनियम १९८८ च्या कलम १७७ नुसार HSRP न बसवल्यास वाहनमालकांना रु. १०००/- दंड भरावा लागेल.
अधिक माहितीसाठी:
अधिक माहितीसाठी www.transport.maharashtra.gov.in किंवा संबंधित HSRP बुकिंग पोर्टलला भेट द्या.