खेड(प्रतिनिधी) स्काऊट गाईड ग्रामीण विभागीय खरी कमाई या स्पर्धा – उपक्रमात भडगाव येथील ज्ञानदीप शिक्षण प्रसारक मंडळ संचलित कै. प्रभाकर गजानन कांबळे ज्ञानदीप विद्या मंदिरने द्वितीय क्रमांक पटकावला. रत्नागिरी भारत स्काऊट- गाईड जिल्हा मेळाव्यात हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
स्काऊट-गाईड अंतर्गत राबवल्या जाणाऱ्या खरी कमाई या उपक्रमाध्ये स्काऊट गाईड प्रत्यक्ष आपल्या परिसरातील घरोघरी जाऊन लोकांशी संवाद साधून स्वतः काम मिळवून स्वकष्टाची कमाई करतात व योग्य तो मोबदला स्वीकारून तो निधी युनिट, स्थानिक, जिल्हा, राज्यस्तरीय.स्वयंसेवी संघटनेकडे पाठवला जातो.
स्काऊट मास्तर व गाईड कॅप्टन याच्या मार्गदर्शनाखाली स्काऊट गाईड उपक्रम यशस्वीरित्या पूर्ण करतात. हा उपक्रम यशस्वीरित्या पूर्ण करण्यासाठी स्काऊट मास्तर संतोष भोसले, महादेव वाघमोडे, शांतीलाल आव्हाड व गाईड कॅप्टन वीणा जाधव यांनी मार्गदर्शन केले.
स्काऊट गाईड यांनी मिळविलेल्या यशाबद्दल संस्था अध्यक्ष अरविंद तोडकरी यांच्या हस्ते विद्यार्थ्यांचा
सत्कार करण्यात आला. याप्रसंगी डॉ. रमणलाल तलाठी, माधव पेठे, विनोद बेंडखळे, पेराज जोयसर दीपक लढ्ढा, भालचंद्र कांबळे, प्रकाश गुजराथी, चंदन पाटणे, प्रफुल्ल महाजन, अनिल शिवदे, रुपल पाटणे, प्राचार्य मगदूम, मुख्याध्यापिका सी. मोरे उपस्थित होते.