माजी सहकार आयुक्त चंद्रकांत दळवी यांच्या हस्ते लोणावळा येथे प्रदान
लांजा (प्रतिनिधी) तालुक्याच्या सहकार क्षेत्रात विशेष उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या लांजा नागरी
सहकारी पतसंस्था मर्या. लांजा या संस्थेला सन २०२४ च्या बँको ब्लू रिबन पुरस्काराने सलग पाचव्यांदा गौरविण्यात आले. लोणावळा येथे
हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
सलग पाचव्यांदा विविध ठेव विभागांमध्ये संस्थेला हा पुरस्कार प्राप्त झाला आहे .पतसंस्थेच्या उल्लेखनीय कामाबद्दल बँको पुरस्कार प्रदान करण्यात येतात. या पुरस्काराच्या मानांकनासाठी संस्थेमार्फत आवश्यक असणारी प्रश्नावली बँको तर्फे मागविली जाते. महाराष्ट्रातील विविध सहकारी संस्थांमधून उत्कृष्ट काम करणार्या संस्थांची तज्ञ परीक्षण समितीमार्फत निवड केली जाते. यामध्ये पतसंस्थेला ३० कोटी ३० कोटी ठेवी या गटातील २०२४ चा बँको ब्लू रिबन पुरस्कार जाहीर झाला होता.
दि. ३० जानेवारी रोजी लोणावळा येथे झालेल्या शानदार सोहळ्यात माजी सहकार आयुक्त चंद्रकांत दळवी यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. लांजा नागरी पतसंस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रशेखर रुमडे व संचालक अनंत आयरे, किशोर यादव यांनी हा पुरस्कार स्वीकारला.
संस्थेच्या एकूण ३२ कोटी ३९ लाख रुपयांच्या ठेवी असून २२ कोटी १९ लाख रुपये रकमेचे येणे कर्ज आहे .गुंतवणूक १४ कोटी ७३ लाख तर स्वनिधी ४ कोटी ७० लाख आहे .तसेच सीडी रेशोचे प्रमाण ६५.९९% असून कर्ज वसुलीचे प्रमाण ९६.८२% इतके आहे .संस्थेला सातत्याने अ ऑडिट वर्ग लाभलेला असून नफ्यात असणारी संस्था असून सभासदांना सतत दहा ते बारा टक्के लाभांश दिला जातो .
संस्थेने गेली ३४ वर्षे सब संस्थेचे सभासद, ठेवीदार यांचा विश्वास जपला असून यात संस्थेचे सर्व सभासद, नियमित कर्ज मिळणारे कर्जदार, सर्व संचालक मंडळ, कर्मचारी, पिग्मी व रिकरींग एजंट यांचे योगदान आहे. संस्थेच्या सापुचेतळे, भांबेड आणि साटवली या तीन ठिकाणी शाखा सुरू असून त्या अत्यंत चांगल्या प्रकारे आर्थिक व्यवसाय करत आहेत .
संस्थेकडे सध्या एसएमएस सुविधा, एनईएफटी आरटीजीएस सुविधा, मनी ट्रान्सफर ,ऑनलाइन लाईट बिल भरणा केंद्र सुरू आहे. या सर्व सेवा सुविधांचा ग्राहकांनी, सभासदांनी लाभ घ्यावा असे आवाहन संस्थेचे चेअरमन शिवाजी कोत्रे, व्हाईस चेअरमन संपदा वाघधरे, मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रशेखर रूमडे व सर्व संचालक मंडळ यांनी केले आहे.
दरम्यान, या पुरस्कारा बद्दल पतसंस्थेवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.